वयस्कर सासूला तिच्याच सुनेने घरामध्ये विटेच्या साह्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनेकडून सासूचा छळ होतोय का, हे पाहण्यासाठी तिच्या नवऱ्यानेच गुप्तपणे घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यामध्ये ही मारहाण कैद झाली आहे.
या प्रकरणी संगीता जैन हिला मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. राजराणी जैन या सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. बिजनोरमधील घरामध्ये गेल्या पाच तारखेला दोघी जणी घरात एकट्याच असताना हा प्रकार घडला. त्यामध्ये सासू पलंगावर बसलेली असताना मागून येऊन संगीता हिने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कपड्यात बांधलेल्या विटेच्या साह्याने तिला डोक्यामध्ये जोरदार मारहाण केली.
संगीता हिचा सात वर्षांपूर्वी संदीप जैन यांच्याशी विवाह झाला. तिने काही दिवसांपूर्वीच नवऱ्याविरोधात हुड्याची, छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याकडे तिने घटस्फोटाचीही मागणी केली असून, त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
वृद्ध सासूला सुनेने विटेने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
या प्रकरणी संगीता जैन हिला मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 12-01-2016 at 11:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman assaults mother in law in uttar pradesh