World’s Best School Prizes 2023 : जागतिक सर्वोच्च शाळा पुरस्कारांसाठी नामांकित झालेल्या जगभरातील १० शाळांपैकी पाच शाळा भारतातील निवडण्यात आल्या आहेत. आनंदाची बाब अशी की, त्यातील तीन शाळा महाराष्ट्रातील आहेत. तर, उर्वरित एक शाळा दिल्लीची असून एक अहमदाबादची आहे. समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. गुरुवारी ही नावे जाहीर करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युकेतील T4 एज्युकेशनकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा Accenture, American Express, Yayasan Hasanah आणि Lemann Foundation यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. Community Collaboration (समुदाय सहयोग), Environmental Action (पर्यावरणीय कृती), Innovation (नावीन्य), Overcoming Adversity (प्रतिकूलतेवर मात करणे) आणि Supporting Healthy Lives (निरोगी जीवनाचे समर्थन करणे) या श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

२०२२ पासून हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. दहापैकी टॉप तीन शाळांची नावे सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहेत. तर, विजेत्या शाळेचं नाव ऑक्टोबरमध्ये जाहीर केलं जाईल. या पुरस्कारासाठी युएसडी २५०००० रुपयांच्या निधीची तरतूद आहे. टॉप फाईव्ह विजेत्यांना यापैकी युएसडी ५०००० रक्कम प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

भारतातील ‘या’ शाळांना मिळाले नामांकन

Community Collaboration या श्रेणीत भारताच्या ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेचा समावेश आहे. ही मुंबईतील शाळा असून स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे.

Overcoming Advertisy या श्रेणीमध्ये स्नेहलया इंग्रजी माध्यम या महाराष्ट्राच्या शाळेचा समावेश आहे. ही अहमदनगर येथील एक धर्मादाय शाळा असून या शाळेने एड्सग्रस्त पालकांच्या मुलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवला आहे.

मुंबईतील शिंदेवाडी पब्लिक स्कूल (आकांक्षा फाऊंडेशन) या शाळेलाही Supporting Healthy Lives या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. लॉकडाऊनंतर या शाळेने रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या आणि कुपोषित बालकांसाठी काम केले.

दिल्लीतील नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय एफ ब्लॉक, दिलशाद कॉलनी ही सरकारी शाळाही या स्पर्धेसाठी Community Collaboration या श्रेणीसाठी नामांकित झाली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील रिवरसाईड शाळेलाही या स्पर्धेसाठी इनोवेशन श्रेणीत नामांकन मिळालं आहे. या शाळेने I Can ही सुरू केलेली योजना जगभर प्रसिद्ध झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds best school prizes 2023 five indian schools on top 10 shortlist 2 from mumbai details here sgk