Nikhil and Nithin Kamath gift Rs 1.5 crore Mercedes to Mother : झेरोधा कंपनीचेचे सह-संस्थापक निखिल कामथ आणि नितीन कामथ यांनी त्यांची आई रेवती कामत यांना त्यांच्या वाढदिवशी एक नवीन मर्सिडीज भेट दिली आहे. मुलांनी दिलेल्या या गिफ्टनंतर रेवती यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेवती कामथ यांनी भेट मिळालेल्या कारच्या चाव्या स्विकारतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांना डोक्यावर फेटा बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे, तर याबरोबरच शाल देखील पांघरण्यात आळी आहे. आपल्या पोस्टमध्ये फोटोला कॅप्शन देताना त्या म्हणाल्या की, “आज मला माझ्या मुलांनी एक नवीन कार भेट दिली आणि इथेही मला कारच्या चाव्या अशा पद्धतीने देण्यात आल्या आणि आणखी एक फेटा आणि शालू.” त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान रेवती कामथ यांनी केलेल्या या पोस्टमध्ये मर्सिडीज जीएलएस एसयूव्ही कार दिसत आहे. या कारची किंमत १.५ कोटी रुपये इतकी आहे. या गाडीला ‘एस-क्लास ऑफ एसयूव्हीज’ असेही म्हणतात. जीएलएस ही गाडी तिच्या इंजिनामध्ये मिळणारे पर्याय, इंटेरियर आणि प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम यासाठी ओळखली जाते.

सोशल मीडियावर केलेल्या त्यांच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांच्या भरभरून कमेंट येत आहेत. अनेक जण त्यांचे या गिफ्टबद्दल अभिनंदन करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रेवती यांनी निखिल आणि नितीन यांच्या झेरोधा कंपनीबरोबरच्या प्रवासाबद्दल माहिती दिली होती. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या मुलांना सातत्याने बुद्धिबळातील स्टॅटिर्जीक डेप्थचा समजून घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. या खेळाने झेरोधाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली, असेही त्या म्हणल्या होत्या.

दरम्यान झेरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांना ईवाय एंत्रप्रोनर ऑफ द इयर २०२४ म्हणून निवडण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zerodha co founders nikhil kamath nithin kamath gift rs 1 5 crore mercedes to their mother post goes viral rak