मार्च महिना सुरू असून, करदाते आपला प्राप्तिकर वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. घरभाडे भत्ता (HRA) हे पगारदार लोकांसाठी कर वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे, ज्यामध्ये कोणत्याही गुंतवणुकीशिवाय कर वाचवता येतो. नोकरदार लोकांना हे माहीत असेल की, HRAचा दावा करण्यासाठी भाडे करार करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच कर बचतीचा लाभसुद्धा मिळू शकत नाही. जर तुम्हीही कर कपात टाळण्यासाठी भाडे करार करणार असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर दुहेरी नुकसान होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या कर प्रणालीमध्येच फायदा

खरं तर भाडे करार करून तुम्ही जुन्या कर प्रणालीमध्येच कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. नवीन कर प्रणालीमधून कोणत्याही प्रकारची कर सूट रद्द करण्यात आली आहे. जुन्या प्रणालीत आयकर कायद्याच्या कलम १०(१३ A) अंतर्गत HRA वर कर सूट भाडे कराराद्वारे दावा केला जाऊ शकते. दावा करण्यापूर्वी HRA किती दिला गेला आहे हे पाहण्यासाठी तुमची पगार स्लिप तपासा. त्याच प्रमाणात तुम्हाला कर सूट मिळेल.

करारनाम्यात मुद्रांकाची विशेष काळजी घ्या

भाडे करार करताना मुद्रांकाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. १०० किंवा २०० रुपयांच्या स्टॅम्पवर केलेला भाडे करार आधी मिळवा. जर तुम्ही वार्षिक १ लाख रुपयांपेक्षा जास्त भाडे भरत असाल तर घरमालकाचे पॅन आणि आधार कार्ड देणे आवश्यक आहे. कराराच्या प्रत्येक पानावर जमीन मालकाची स्वाक्षरी असणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.

करारामध्ये मासिक भाड्याचा उल्लेख करा

भाडे करार करताना लक्षात ठेवा की, त्यात फक्त मासिक भाडे नमूद केले पाहिजे. काही लोक ६ महिन्यांसाठी किंवा वर्षभरासाठी भाडे करार करून घेतात आणि ते निश्चित करतात. त्यामुळे मासिक भाडे मोजण्यात अडचण येत आहे. याशिवाय दावा करताना तुम्ही भाडे स्लिप म्हणजेच प्रत्येक महिन्याची भाडे पावतीदेखील जोडली पाहिजे. अन्यथा तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.

करारामध्ये वेळेचा उल्लेख करा

तुम्ही किती दिवसांपासून भाड्याच्या घरात राहत आहात, याचाही उल्लेख भाड्याच्या करारात करणे आवश्यक आहे. साधारणपणे लोक एक वर्ष किंवा ११ महिन्यांसाठी भाडेकरार करतात, जे पुढे वाढवले ​​जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे करार हा त्याच कालावधीचा असावा, ज्यासाठी तुम्ही कर सवलतीचा दावा करत आहात.

अतिरिक्त खर्च जोडा

तुम्ही तुमचे अतिरिक्त खर्चदेखील भाडे करारामध्ये समाविष्ट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही भाड्याच्या घरात काहीतरी वेगळे खर्च केले असेल, जसे की स्वयंपाकघरात चिमणी बसवणे किंवा वायुवीजना (ventilation)साठी डक्ट बनवणे. तुम्ही हे सर्व खर्च भाडे करारामध्येदेखील समाविष्ट करू शकता. यावर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 things to keep in mind while entering into a rental agreement to save tax or face huge penalties vrd