तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदाच्या कोट्यवधी बँक खातेदारांना २४ मार्च २०२३ पर्यंत एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. जर तुम्ही हे केले नाही, तर नंतर तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. खरं तर बँक ऑफ बडोदा (BoB)ने त्यांच्या खातेदारांना सेंट्रल केवायसी (C-KYC) करून घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नसेल तर लगेच बँकेत जाऊन हे काम आधी पूर्ण करून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेने ट्विट करून माहिती दिली

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल ट्विट करून बँकेने माहिती दिली आहे. ज्या ग्राहकांना बँकेने नोटीस, एसएमएस किंवा C-KYCसाठी बोलावले आहे, त्यांनी बँकेत जाऊन त्यांची KYC कागदपत्रे जमा करावीत. तुम्हाला हे काम २४ मार्च २०२३ पूर्वी करायचे आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले असेल तर याकडे दुर्लक्ष करा.

सेंट्रल केवायसी म्हणजे काय?

आता खाते उघडणे, जीवन विमा पॉलिसी खरेदी करणे, डीमॅट खाते उघडणे इत्यादी सर्व कामांसाठी ग्राहकांना पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज भासणार नाही. आता फक्त एकदाच केवायसी केल्यावर सर्व कामे पूर्ण करता येतील. बँक आपल्या ग्राहकांना C-KYC चे रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सादर करते. यानंतर ग्राहकाला वेगवेगळ्या कारणांसाठी केवायसी करण्याची गरज भासत नाही आणि बँकांची माहिती केंद्रीय केवायसीशी जुळते. हा डेटा जुळवून बँक किंवा कोणतीही संस्था केवायसी नियमांची पूर्तता झाली की नाही याची खातरजमा करते. सेंट्रल केवायसीचे व्यवस्थापन करण्याचे काम CERSAI करते. या प्रकरणात केवळ या क्रमांकावरून ग्राहकाची केवायसी संबंधित माहिती मिळू शकते.

सेंट्रल केवायसी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यास मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही सेंट्रल केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. यामुळे तुम्हाला नंतर त्रास सहन करावा लागणार नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attention bank of baroda customers complete this task by 24 march 2023 vrd