पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये का असतात आडव्या रेषा? जाणून घ्या... | Do you know the reason Why plastic water bottles have lines in its design know scientific reason behind it | Loksatta

पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये का असतात आडव्या रेषा? जाणून घ्या…

प्लास्टिकच्या बाटलीवर असणाऱ्या आडव्या रेषांमागचे वैज्ञानिक कारण जाणून घ्या

पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये का असतात आडव्या रेषा? जाणून घ्या…
प्लास्टिकच्या बाटलीवर आडव्या रेषांचा उपयोग जाणून घ्या (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिकच्या बाटल्यांवर तुम्ही आडव्या रेषा पाहिल्या असतील. पण या रेषांचा प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये समावेश का केला जातो, याबाबत खूप कमी जणांना माहिती असते. पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये या आडव्या रेषांचा समावेश करण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. कोणते आहे ते कारण जाणून घ्या.

प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये असणाऱ्या रेषांमागचे वैज्ञानिक कारण
प्लास्टिक बाटल्यांवर असणाऱ्या या रेषांचा समावेश डिझाईनमध्ये बाटलीच्या सुरक्षेसाठी केला जातो. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या बाटल्या बनवताना सॉफ्ट प्लास्टिक वापरले जाते. या सॉफ्ट प्लास्टिकपासून बनलेल्या बाटल्यांवर आडव्या रेषा बनवल्या नाहीत तर काही दिवसानंतर त्या बाटल्या फुटू शकतात. या रेषांमुळे बाटली मजबुत होते. या कारणामुळे प्रत्येक प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये आडव्या रेषा असतात.

आणखी वाचा : व्हॉटसअ‍ॅपवरील Video Call रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

तसेच या रेषांमुळे बाटली पकडणे ही सोपे होते. अनेकवेळा प्रवासादरम्यान पाणी पिण्यासाठी अशा बटल्यांचा वापर केला जातो. तेव्हा अधिक काळासाठी अशी बाटली हातात धरण्यासाठी त्यावर असणाऱ्या रेषांची मदत होते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 17:34 IST
Next Story
व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा