Premium

आरती, भजन, किर्तन सुरू असताना लोकं टाळ्या का वाजवतात? कोणी सुरू केली प्रथा? जाणून घ्या यामागचं रहस्य

Clapping: भजन म्हणताना टाळ्या का वाजवल्या जातात? याचा तुम्ही कधी विचार केलाय का, यामागील खरं कारण काय, जाणून घ्या…

Clapping In Arati Bhajan
आरती करताना टाळ्या का वाजवतात (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नुकतंच गणपती बाप्पांच आगमण झालंय. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. हा सण भारताच्या वेगवेगळ्या भागात साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या काळात नऊ दिवस गणतीची पूजा केली जाते. भजन-कीर्तनात अनेक प्रकारची वाद्ये वाजवली जातात, तरीही लोकं अलगदपणे भक्तीत ‘टाळ्या’ का वाजवतात? टाळी वाजवून गायनात इतके तल्लीन कसे होऊन जातात? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना! तर ही टाळी वाजवण्याची परंपरा कशी सुरू झाली? इतिहास काय सांगतो? यामागचं रहस्य आम्ही आपल्या समोर आज उलघडणार आहोत. वाचा माहिती सविस्तर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पौराणिक कथेत दडलंय ‘टाळीचं’ उत्तर

पौराणिक कथेनुसार, ‘टाळी’ वाजवण्याची प्रथा भगवान विष्णूच्या भक्त प्रल्हादने सुरू केली होती. वास्तविक, प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यप यांना विष्णूजींची भक्ती आवडली नाही. त्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण प्रल्हादवर या सर्वांचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी हिरण्यकश्यपने वाद्य नष्ट केले आणि असे केल्याने प्रल्हाद भगवान विष्णूची पूजा करू शकणार नाही, असे हिरण्यकश्यपला वाटले. पण असे झाले नाही, प्रल्हादने हार मानली नाही. श्री हरी विष्णूच्या स्तोत्रांना ताल देण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही हातं वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे एक ताल तयार झाला आणि याला ‘टाळी’ हे नाव पडले. तेव्हापासून ही परंपरा आजही कायम आहे.

(हे ही वाचा : Ganesh Chaturthi 2023 History : गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? काय आहे त्यामागील कथा; जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, इतिहास व महत्त्व)

कोणतीही पूजा किंवा भजन-कीर्तनाच्या वेळी लोक टाळ्या वाजवतात. आरती गाताना टाळ्या वाजवणे देखील खूप शुभ मानले जाते. असं करतांना भाविक देवाच्या भक्तित तल्लीन होऊन जातो. मनापासून केलेली ही भक्ती त्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणि उत्साह घेऊन येते, असेही मानले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you know why clap is played in bhajan kirtan what is its how did clapping start pdb

First published on: 21-09-2023 at 18:32 IST
Next Story
Ganesh festival Ganpati Gauri: कोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’!