EPFO : तुम्हाला तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा ईपीएफओ खात्याशी मोबाईल नंबर अॅड कसा करायचा? याविषयी माहिती नसेल तर ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. आता पीएफ खातेदारांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएन (Universal Account Number- UAN) क्रमांक खूप महत्त्वाचा असतो. हा नंबर भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रत्येक सदस्याला दिला जातो. हा एक कायमस्वरूपी नंबर असतो. यूएएनच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पीएफ खातं ऑनलाईन वापरु शकता. यूएएनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स कळत असतो. दरम्यान, तुम्हाला जर तुमच्या ईपीएफओ खात्याशी तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा अॅड करायचा असेल यासाठीची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईपीएफओ खात्याशी मोबाईल नंबर कसा बदलायचा?

तुम्ही तुमच्या ईपीएफओ खात्याशी जोडलेले तुमचे नाव किंवा नंबर ईपीएफ सदस्य पोर्टलद्वारे किंवा ईपीएफ कार्यालयात जाऊन देखील अपडेट करू शकता. तसेच ईपीएफ खात्यात कोणतेही बदल करण्याच्या आधी ईपीएफ खात्याशी तुमचं आधार लिंक केलेलं आहे ना? याची खात्री करा.

ईपीएफ खात्याशी मोबाईल नंबर कसा नोंदवायचा?

ईपीएफओ सदस्य पोर्टलला भेट द्या, अधिकृत वेबसाइट ओपन करा आणि यूएएन सक्रिय करण्याच्या ऑप्शनवर जा. तेथे अॅक्टिव्हेट यूएएनवर क्लिक करा आणि या पर्यायाद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या ईपीएफ खात्याशी लिंक करू शकता. तसेच तेथील आवश्यक तपशील प्रविष्ट करा. तसेच तुमचा यूएएन नंबर, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर सबमिट करावी करा.पूर्ण प्रमाणीकरण कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि आधार-आधारित पडताळणीसाठी संमती द्या. तुमच्या मोबाईलवर ओटीपी मिळवण्यासाठी “Get Authorization PIN” वर क्लिक करा. पडताळणी करा आणि सक्रिय करा. सक्रियकरण पूर्ण करण्यासाठी ओटीपी प्रविष्ट करा, तुमचा मोबाइल नंबर तुमच्या ईपीएफ खात्यात यशस्वीरित्या नोंदणी करा.

ईपीएफ खात्यात तुमचा मोबाईल नंबर कसा बदलायचा?

ईपीएफओ सदस्य पोर्टलवर लॉग इन करा. तुमचा यूएएन आणि पासवर्ड वापरून तुमचे खाते अक्सेस करा. व्यवस्थापित करा आणि पुढे जाण्यासाठी संपर्क तपशील वर क्लिक करा. मोबाइल नंबर बदला हे ऑपश्न निवडा. तसेच तुमचा नवीन मोबाइल नंबर दोनदा एंटर करा आणि मोबाइल ओटीपी मिळवावर क्लिक करा. ओटीपी पडताळणी करा, तुमच्या नवीन नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल तो तेथे भरा. विनंती सबमिट करा, ईपीएफओ पोर्टलमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo news how to change mobile number of epfo account do you know find out in marathi gkt