How Passengers Get Oxygen In Aeroplane Know The System Behind It | Loksatta

विमानात ऑक्सिजन कसा मिळतो? जाणून घ्या

विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ऑक्सिजनची सोय कशी केली जाते जाणून घ्या

How Passengers Get Oxygen In Aeroplane Know The System Behind It
विमानात ऑक्सिजन कसा मिळतो जाणून घ्या (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विमान प्रवासादरम्यान त्यातल्या यंत्रणेविषयी आपल्याला अनेकदा कुतूहल वाटते. इतक्या उंचीवर प्रवाशांना ऑक्सिजन कसा मिळतो? त्यासाठी वेगळी सुविधा केली जाते का असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. विमानात ऑक्सिजन कसा मिळतो जाणून घ्या.

आपण जमिनीपासून जसजसे उंचावर जातो तसतसे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते, यामुळे अनेकांना उंचावर गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो किंवा दम लागतो. याचा अनुभव बऱ्याच वेळा आला असेल. पण विमानात प्रवास करताना जमिनीपासून प्रचंड उंचीवर असुनही ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही, यामागचे कारण म्हणजे विमानात प्रवासादरम्यान प्रवाशांना वातावरणात उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवढा मुबलक प्रमाणात होतो. इमरजन्सीसाठी वेगळी व्यवस्था देखील करण्यात येते.

आणखी वाचा: औषधांच्या पाकिटावर लाल रेष का असते? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे कारण

जमिनीवर उपलब्ध असणारा ऑक्सिजन आणि विमान प्रवासादरम्यान इतक्या उंचीवर उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण सारखे नसते. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होऊ नये यासाठी विमानात एक यंत्रणा असते. ज्याद्वारे वातावरणातील उपलब्ध ऑक्सिजनचा पुरवढा प्रवाशांना केला जातो. त्यामुळे प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही आणि कोणताही त्रास होत नाही.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:44 IST
Next Story
भारताचं आर्थिक वर्ष १ एप्रिलपासूच का सुरू होतं? ब्रिटिशांपासूनची परंपरा अद्याप कायम का? जाणून घ्या