स्वप्नात अचानक उंचावरून धाडकन खाली पडल्याचा भास का होतो? नक्की कारण काय जाणून घ्या

तुम्हालाही झोपेत अनेकदा असा भास झाला असेल, तर त्यामागचं कारण काय आहे जाणून घ्या.

hypnic jerk causes why do wake up suddenly when saw ourseleves falling from height in a dream
स्वप्नात अचानक उंचावरून धाडकन खाली पडल्याचा भास का होतो? जाणून घ्या यामागचं कारण काय (photo credit – pixabay, pexels)

झोपेत आपल्याला वेगवेगळी स्वप्न पडत असतात. कधी ही स्वप्न चांगली असतात तर कधी खूप भयानक. पण अनेकदा झोपेत आपल्याला अचानक एका उंचावरून धाडकन खाली पडल्याचे स्वप्न पडले आणि झोपेतून पटकन जाग येते. पण झोपेतून उठल्यानंतर पाहतो तर आपण बेडवरच असतो. अशावेळी अनेकदा मनात प्रश्न येतो की, असे का होते? जर तुम्हाला या मागचे कारण माहित नसेल तर आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

वास्तविक या परिस्थितीला हिपनिक जर्क असे म्हणतात. स्वप्नातील अशा धक्क्यामुळे तुम्हाला झोपेतून अचानक जाग येते. यावेळी वास्तव आणि स्वप्नातील फरक काही वेळ ओळखता येत नाही.

मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवतो.

आपल्या मेंदूला सतत शरीरावर नियंत्रण ठेवण्याची सवय असते. यात मेंदूला शरीराच्या प्रत्येक अवयवाची माहिती असते. आपण जेव्हा श्वास घेतो, केव्हा झोपतो, केव्हा उठतो याची सर्व माहिती मेंदूकडे असते. यात मेंदू एका चौकीदारासारखे काम करते. आपले कोणत्याही संकाटापासून संरक्षण करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. धोक्याची जाणीव झाल्यावर आपल्या बचावासाठी तो शरीरातील प्रत्येक अवयवांना सिग्नल पाठवते.

हिपनिक जर्क हा देखील याच्याशी संबंधित आहे. जेव्हा आपण झोपेलेले असतो तेव्हा आपल्याला पडल्यासारखे वाटते. कारण यादरम्यान आपले डोळे बंद असतात आणि ह्रदयाचे ठोके मंदावतात तेव्हा अनेक वेळा मेंदू गोंधळून जातो.आपण मरत तर नाही ना असे आपल्या मेंदूला वाटू लागते आणि तो लगेच हालचाली करु लागतो.

यावेळी आपल्याला जागे करण्यासाठी मेंदू एक अतिशय स्मार्ट मार्ग अवलंबतो, ज्यात तो स्वप्नात अशी प्रतिमा तयार करतो ज्यामध्ये आपण उंच जागेवरून, शिडीवरून किंवा धोकादायक ठिकाणावरून पडत आहोत असा भास होतो. अशा स्थितीत मेंदू अचानक पायांना सिग्नल पाठवतो. सिग्नल मिळताच आपल्याला एका धक्क्याने जाग येते. अशाप्रकारे मेंदूचे कार्य पूर्ण होते. जागे झाल्यानंतर आपल्या मेंदूला आपण जिवंत असल्याचे समाधान मिळते. यानंतर सर्व स्थिती सामान्य झाल्यानंतर काही वेळाने पुन्हा आपल्याला झोप येते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 11:59 IST
Next Story
World Oral Health Day: तोंडाची स्थिती पाहून आजाराचे निदान करता येते का? मौखिक आरोग्य आणि शरीर यांमध्ये काय संबंध असतो?
Exit mobile version