Paris Olympics 2024 : सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी मेडल जिंकणे, हे या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. प्रथम विजेता खेळाडूला गोल्ड मेडल, द्वितीय विजेता खेळाडूला सिल्वर मेडल आणि तृतीय क्रमांकाच्या विजेता खेळाडूला कांस्यपदक दिले जाते. जेव्हा एखादा खेळाडू मेडल जिंकतो, त्यानंतर खेळाडूंना तुम्ही जिंकलेले मेडल दातांनी चावताना पाहिले असेल पण हे खेळाडू असे का करतात? मेडल का चावतात? आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या. (Why Do Winning Olympians Pose Biting Their Medals?) हेही वाचा : National Pension System: नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे काय? फक्त करबचत नाही, तर प्रत्येकासाठी ठरेल लाभदायी; योजनेंतर्गत पैसे गुंतवण्याचे आहेत ‘हे’ चार फायदे सहसा आपण दातांचा उपयोग हा जेवणासाठी, बोलण्यासाठी आणि हसण्यासाठी करतो पण तु्म्हाला माहिती आहे का एकेकाळी खरे मौल्यवान धातू ओळखण्यासाठी दातांचा उपयोग केला जात असे. सोने, चांदी आणि तांबे हे मऊ धातू आहेत, त्यामुळे या धातूंचे मेडल चावल्यानंतर त्यावर दातांच्या खुणा सहज उमटतात. सोन्याची नाणी आणि सोन्याच्या इतर वस्तू खरे आहेत का, हे पडताळण्यासाठी दाताने धातू चावणे, हा एक उपाय मानला जात असे. जर धातूवर दातांच्या खूणा दिसल्या नाही तर त्यावर फक्त सोन्याचा मुलामा दिला आहे, असा निष्कर्ष काढला जात असे. ऑलिम्पिकमध्ये खेळाडू जिंकलेले मेडल दातांनी का चावतात? (Why do Olympians bite their medals) ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकांमध्ये प्रामुख्याने स्टर्लिंग चांदी असतात आणि कांस्यपदक हे प्रत्यक्षात तांब्यापासून बनवली जातात पण ऑलिम्पिक खेळाडू धातुंची शुद्धता तपासण्यासाठी नव्हे तर फक्त कॅमेऱ्यावर आकर्षक पोझ देण्यासाठी विजयानंतर मेडल दातात पकडतात आणि फोटो काढतात आणि ही परंपरा वर्षानुवर्षे टिकून आहे. हेही वाचा : Mukhyamantri Annapurna Yojana : महिलांना मिळणार तीन सिलिंडर मोफत; कोण ठरणार पात्र? कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सर्व माहिती पॅरिसमध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे ३३९ इव्हेंट्स आयोजित करण्यात आले आहेत. भारताकडून एकूण १०२ खेळाडूंनी या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. काही खेळाडूंना पदक मिळवण्यात यश आले आहेत तर काही खेळाडू अपयशी ठरले. यंदा भारताच्या पदरी किती पदके पडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.