सध्या सर्वत्र सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंटरनेटशिवाय माणसांची अनेक होणे सध्याच्या काळामध्ये अजिबात शक्य नाही. देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. तसेच अनेक जण आपल्या घरामध्ये वायफाय सुद्धा बसवतात. ज्यामुळे त्यांना अधिक डेटा आणि स्पीड मिळतो. हल्ली हल्ली सार्वजनिक ठिकाणी देखील नागरिकांसाठी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या काळात रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल्स आणि अन्य अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय हॉटस्पॉट्स उपलब्ध आहेत. तुम्ही त्या वायफायचा वापर करून तुमच्या मोबाईलचा डेटा वाचवू शकता. मात्र सार्वजनिक ठिकाणी असलेले वायफाय तुमच्या घरातील वायफाय इतके सुरक्षित नसते. सार्वजनिक ठिकाणचे वायफाय वापरता काही गोष्टींची काळजी घेतली नाहीतर तुमचा वैयक्तिक डेटा हॅक होण्याची शक्यता असते.आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणचे वायफाय कनेक्ट करत असताना या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा : ऑनलाईन जॉबद्वारे पैसे मिळवणे पडलं महागात, ९ लाखांना बसला गंडा; दिल्लीतील धक्कादायक घटना

१ .

जर का तुम्हाला पब्लिक वायफाय वापरायचे असल्यास तुम्ही सेमी -वायफाय असलेल्या कनेक्शनशी तुमचा फोन कनेक्ट करा. म्हणजेच असे कनेक्शन की ज्यात वायफाय कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे वायफाय तुम्हाला विमानतळ, कॉफी शॉप्स इत्यादी ठिकाणी मिळू शकतात.

२.

तुम्ही तुमचा फोन सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वायफायशी कनेक्ट करत असाल, तर हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जसे तुम्ही , तुमच्या कॉम्प्युटरवर फाईल शेअरिंग बंद करत असता तसेच इथेसुद्धा फक्त तुम्हाला आवश्यक असणारे अ‍ॅप्लिकेशन सुरु ठेवावेत.

३.

तसेच सुरक्षित राहण्याची पुढील पायरी म्हणजे म्हणजे ऑनलाईन बँकिंग आणि सोशल मीडियासारखी वैयक्तिक माहिती असलेल्या अकाउंटमध्ये साइन इन करणे टाळले पाहिजे. तुम्ही साइन इन करणारी साईट कितीही सुरक्षित असली तरी देखील त्यावरील तुमची वयक्तिक माहिती खुल्या वायफायवर हॅकर्सना उपलब्ध होऊ शकते. यासाठी हे करणे टाळले पाहिजे. तसेच ऑनलाईन शॉपिंग आणि बँकेशी संबंधित व्यवहार देखील करू नयेत.

४.

तसेच वायफायवरून ज्या वेबसाईटवर क्लिक करणार आहात ती वेबसाईट HTTP एनक्रिप्ट असणे आवश्यक आहे. तुम्ही हे तुमच्या वेबसाईटच्या URL मध्ये तपासून पाहू शकता. तुम्हाला URL (HTTPS) हिरव्या रंगात दिसेल आणि त्याच्या पुढे एक लॉकचे इमेज दिसले. हे इमेज नसल्यास ते नेटवर्क सुरक्षित नाही हे समजून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Foxcon ‘या’ राज्यात करणार तब्बल ८ हजार कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार निर्मिती होणार

५.

तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप हा कायम अपडेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये अँटीव्हायरस अपडेट असला पाहिजे. अँटीव्हायरस तुमच्या डिव्हाइसचे अनेक प्रकारचे मालवेअर, खराब नेटवर्क , वेबसाईट आणि स्पॅम फाइल्सपासून संरक्षण करतो.

६.

जर का तुम्ही पब्लिक वायफाय वापरून लॉग इन करत असाल तर काम झाल्यावर लॉगआऊट करायला विसरू नका. हे चालू ठेवल्याने तुमचं फोन किंवा लॅपटॉपमधील माहितीला असणारी सुरक्षा कमी होऊ शकते.

७.

ज्या वेळेस तुम्ही वायफायचा वापर करत नसाल तेव्हा तुम्ही तुमचे वायफाय बंद ठेवणे आवश्यक आहे. कारण कधीकधी काही नेटवर्क ऑटोमॅटिक कनेक्ट होत असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public wifi use 7 safety tips to keep in mind while connecting tmb 01
First published on: 23-03-2023 at 11:59 IST