Strangest fish in the world: समुद्राला अनेकदा विविध रहस्यमय गोष्टींचा खजिना म्हणूनदेखील ओळखले जाते. कारण- त्यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, दगड, हजारो जातींचे मासे, अनेक रासायनिक द्रव्ये अशा अनेक गोष्टी आढळतात. समुद्रात आढळणाऱ्या हजारो माशांपैकी काही मासे असेदेखील आहेत; ज्यांना जगातील सर्वात विचित्र मासे म्हणून ओळखले जाते. या माशांचा रंग, आकार, डोळे खूप वेगळे असून, त्यांची रचना सामान्य माशांच्या तुलनेत खूप वेगळी आहे. त्यातील काही मासे असेदेखील आहेत; जे काही क्षणांत स्वतःचा रंग बदलू शकतात. तर, काही मासे पक्ष्यांप्रमाणे उडूही शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून जगातील विचित्र माशांपैकी काही माशांबद्दल माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील सर्वांत विचित्र मासे

पॅसिफिक बॅरेली

जगातील सर्वांत विचित्र माशांपैकी हा एक मासा आहे. या विचित्र माशाच्या कपाळावर हिरव्या रंगाच्या बल्बसारखे डोळे असतात आणि त्याच्या चेहऱ्याचा पुढचा भाग पूर्णपणे काचेसारखा पारदर्शक असतो. काही वर्षांपूर्वी या माशाला पहिल्यांदा पाहण्यात आले होते. त्यावेळी हा एलियनसारखा दिसणारा मासा पाहून वैज्ञानिकसुद्धा आश्चर्यचकित झाले होते.

फ्लॉवरहॉर्न सिचलिड

फ्लॉवरहॉर्न सिचलिड हादेखील जगभरातील माशांपैकी एक विचित्र दिसणारा मासा म्हणून ओळखला जातो. या माशाच्या सुजलेल्या कपाळाला न्युकल कुबड म्हणतात. फ्लॉवरहॉर्न सिचलिड मासे वेगाने नवीन प्रजाती तयार करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. या कारणास्तव ते मत्स्यपालकांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यामुळे फ्लॉवरहॉर्न सिचलिड मत्स्यपालनाच्या व्यापारासाठी निवडलेले एक उत्पादन आहे.

उडणारा मासा

उडणारा मासाही खरोखर अस्तित्वात आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हो, हे खरे आहे. जगभरातील विचित्र माशांमध्ये उडणारा मासादेखील आहे. तांत्रिकदृष्ट्या ते उडण्याऐवजी सरकतात. हा मासा सात मीटरपर्यंत हवेत उडू शकतो. एका उडीमध्ये तो जवळपास २०० मीटर अंतर पार करतो. हवेत उडण्यासाठी तो आपले पर म्हणजेच पंख हवेत भिरकावून, समुद्राच्या लाटेसोबत उडी मारतो आणि पक्ष्यासारखा हवेत तरंगतो. परंतु, जर तापमान २० अंशाच्या खाली असेल, तर या माशांना हवेत उडता येत नाही.

हेही वाचा: स्थलांतरित पक्षी थव्याने हवेत उडताना एकमेकांवर आदळत कसे नाहीत ? घ्या जाणून…

सॉफिश

जगातील विचित्र माशांपैकी एक असलेल्या या सॉफिशच्या तोंडासमोर करवतीप्रमाणे लांब चोच असते. त्याची लांबी पाच ते सहा फूट असते. जरी या माशाचे खरे नाव सॉफिश असले तरी त्याला ‘कारपेंटर शार्क’, असेही म्हणतात. सॉफिशची कमाल लांबी २३ फूट किंवा त्याहून अधिक असू शकते. तसेच त्यांचे आयुष्य २५ ते ३० वर्षे आहे. हा मासा शरीरातच अंडी घालतो. तसेच या माशाचे पंख आणि दात औषध म्हणून वापरले जातात.

मॅन्ग्रोव्ह रिव्हुलस

हा मासा सहसा खारट तलावांमध्ये राहतो. परंतु, जसजसे तलावातील पाणी सुकत जाते तसतसे हे मासे कुजलेल्या लाकडातील ओलसर पोकळीत झिरपतात, यावेळी ते चयापचय न बदलता, ६६ दिवसांपर्यंत तेथे राहू शकतात.

फोर्सेप्स बटरफ्लायफिश

फोर्सेप्स बटरफ्लायफिश; ज्याला यलो लाँगनोज बटरफ्लायफिश, असेही म्हणतात. त्यांच्या सुंदरतेमुळे त्यांना मस्त्यपालकांची खूप मागणी आहे. लाँगनोज बटरफ्लायफिश ही मोठ्या प्रमाणावर वितरित केलेली प्रजाती आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weirdest fish do you know the strangest fish in the world flying fish forceps butterflyfish mangrove rivulus sap
First published on: 05-05-2024 at 14:35 IST