Which Country Invented Chess : आजकाल बुद्धिबळ जगभरात लोकप्रिय खेळ आहे आणि लाखो लोक या खेळाचा आनंद घेतात. बुद्धिबळ खेळल्याने बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. जगातील सर्वांत लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या बुद्धिबळाचा शोध कोणत्या देशाने लावला हे तुम्हाला माहीत आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुद्धिबळ म्हणजे काय?

बुद्धिबळ हा एक-दोघात खेळला जाणारा (two-player) स्ट्रॅटेजी बोर्ड गेम आहे, जो ६४ चौरस असलेल्या चेकर्ड बोर्डवर खेळला जातो, त्याचे नियम ठरलेले असतात. या खेळात दोन खेळाडू असतात, प्रत्येक खेळाडूकडे १६ तुकडे (pieces) असतात.

उद्दिष्ट काय आहे?

बुद्धिबळाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्ध्याच्या राजाला (किंग) ‘चेकमेट’ स्थितीत आणणे आहे म्हणजे राजाला अशा स्थितीत आणणे की, तो पकडला जाईल आणि त्याला वाचायला कोणतीही सुरक्षित जागा किंवा हालचाल नसेल.

बुद्धिबळाचा शोध कोणत्या देशाने लावला?

सहाव्या शतकात गुप्त राजवंशाच्या काळात भारतात बुद्धिबळाचा शोध लागला.

बुद्धिबळाची उत्क्रांती

बुद्धिबळाचा विकास वर्षांनुवर्ष झाला आहे आणि आता १५०० वर्षांनंतर तो जवळजवळ १७२ देशांमध्ये खेळला जातो.

मूळ भारतात

बुद्धिबळाचे सुरुवातीचे नाव चतुरंग होते, जे भारतात विकसित झाले. त्यानंतर हे पर्शियामध्ये ‘शतरंज’ आणि मग युरोपमध्ये पसरले.

संस्कृत मूळ

बुद्धिबळाची अनेक नावे आहेत. त्या नावांमध्ये अरबीमध्ये शतरंज, तिबेटीमध्ये चंदेराकी व पर्शियनमध्ये चतरंग यांचा समावेश आहे..

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which country invented chess know details dvr