सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही माहिती खोट्या दाव्यासह व्हायरल होते. अशा वेळी ‘फॅक्ट चेकिंग’ महत्त्वाची भूमिका बजावते. फॅक्ट चेकिंगमधून खरी माहिती वाचकांसमोर येते. आज आपण इंटरनेटच्या जगातील सर्वांत मोठी मेटा कंपनी फॅक्ट चेकिंग कशी करते, याविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फेसबुक, इन्स्टाग्राम व थ्रेड्स यांसारख्या सोशल मीडियावर खोट्या माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी मेटा ‘फॅक्ट चेकिंग’चे काम करते.

‘फॅक्ट चेकिंग’ कोण करतं?

सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा अधिकाधिक प्रसार होणे टाळण्याच्या दृष्टीने मेटाने २०१६ पासून त्यांच्या ‘थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग’अंतर्गत पत्रकारांना काम दिले आहे. त्यामध्ये सध्या ८० मीडिया संस्थांचा समावेश आहे. युनायटेड स्टेट्समध्ये, मेटाकडे यासाठी १० मीडिया पार्टनर्स आहेत, ज्यात AFP, USA Today आणि फॅक्ट चेकिंग साइट्स, लीड स्टोरीज व पॉलिटीफॅक्टच्या विशेष तज्ज्ञांचा समावेश आहे. या पार्टनर्सना इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्क (IFCN)द्वारे निवडले जाते. IFCN द्वारे निवडून येण्यासाठी मीडिया संस्थांना संपादकीय गुणवत्ता, तटस्थता (neutrality) व स्वातंत्र्य इत्यादी अटींची पूर्तता करणे आवश्यक असते.

फॅक्ट चेकर्स काय करतात?

AFP कडून २६ भाषांमध्ये फॅक्ट चेक लेख प्रकाशित केले जातात; जेणेकरून प्रकाशित केलेले लेख त्या त्या भाषांचे वाचक वाचू शकतील.
ते हे दावे दिशाभूल करणारे आहेत, हे स्पष्ट शब्दांत सांगतात आणि वाचकांना योग्य माहिती पुरवतात. AFP चे १५० फॅक्ट चेकर्स दिशाभूल करणारे, धोकादायक ठरू शकतात, असे दावे आणि प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या गोष्टी ओळखतात. त्यानंतर त्यामागील तथ्यांची पडताळणी करतात आणि काय खोटे आणि खरे, हे समोर आणतात.

सर्व ठोस पुरावे एकत्रित करून, ते पारदर्शकपणे स्रोत आणि अनेक गोष्टी पुन्हा तपासतात. ते त्यांच्या तपासाचे टप्पे क्रमवार समजावून सांगतात आणि शक्य असेल तर ज्या स्रोतांवरून त्यांना माहिती मिळाली आहे, त्यांच्या लिंक्सचासुद्धा या फॅक्ट चेकिंग लेखामध्ये समावेश करतात. फॅक्ट चेक लेख लिहिणारी मीडिया संस्था त्यांच्या स्वतःच्या वेबसाइटवर हा लेख प्रकाशित करतात.

मेटा फॅक्ट चेक कसे वापरतात?

  • ऑनलाइन व्हायरल होणाऱ्या दाव्यावर फॅक्ट चेक लागू करण्यासाठी, मीडिया संस्था मेटाद्वारे पुरविलेल्या इंटरफेसमध्ये त्यांच्या लेखाची वेब लिंक प्रकाशित करते
  • हा इंटरफेस चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती असलेल्या सोशल मीडिया पोस्टशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो.
  • त्यामुळे दिशाभूल करणारी पोस्ट सोशल प्लॅटफॉर्मवर कमी प्रमाणात दिसते आणि पोस्टच्या बाजूने ‘असत्य’ किंवा ‘संभ्रमित’ यांसारखे रेटिंग दिसून येतात.
  • पोस्ट प्लॅटफॉर्मवरून काढली जात नाही. त्याऐवजी फॅक्ट चेकिंग लेखाची लिंक पोस्टच्या खाली दिसते. अशा रीतीने वाचकांच्या ती चुकीची वा खोटी माहिती लवकर लक्षात आणून दिली जाते.
  • ज्या युजर्सनी दिशाभूल करणारी पोस्ट शेअर केली आहे, त्यांनाही फॅक्ट चेकिंग लेखाची लिंक पाठवून एक सूचना दिली जाते.
  • शेअर केलेल्या युजरने ती माहिती दुरुस्त केल्यास ‘असत्य’ किंवा ‘संभ्रमित’सारखे रेटिंग तेथून काढले जाते. तसेच त्यावरील निर्बंधसुद्धा काढले जातात.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who does fact checking what do fact checkers do and how does they work read more about fact checking programme ndj