भारतात देवी-देवतांची अनेक जागृत देवस्थानं आहेत. यातील काही मंदिरं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत, तर काही मंदिरं त्यांच्या अनोख्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध अशी देवस्थाने आहेत. ज्याप्रकारे मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबा देवी, महालक्ष्मी मंदिरांना भाविक आर्वजून भेट देतात, त्याच प्रकारे पुणे जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविक गर्दी करताना दिसतात. शिवाय पुण्यात काही मंदिरं अशी आहेत, ज्यांचे नाव ऐकल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. कारण पुण्यात काही गणपती मंदिरांना मोदी गणपती, गुंडाचा गणपती; तर हनुमानाच्या काही मंदिरांना पावट्या मारुती, भांग्या मारुती अशी नावे आहेत. या मंदिरांच्या नावामागे स्वतःचा वेगळा इतिहास आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आम्ही तुम्हाला पुण्यात प्रसिद्ध असलेल्या ‘भिकारदास मारुती’ मंदिराचा इतिहास सांगणार आहोत. या मंदिराचे नाव ‘भिकारदास मारुती’ कसे पडले? यामागची कथा काय?

दीडशे ते दोनशे वर्ष जुने मंदिर

‘भिकारदास मारुती’ मंदिर पुण्याच्या सदाशिव पेठेत असून या मंदिराची स्थापना जवळपास दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्या काळी या मंदिराची स्थापना गुजराती नागर समाजातील ‘भिकारदास सराफ’ या व्यक्तीने केली होती. जवळपास १८१८ च्या सुमारास या परिसरात माळी लोकांची मोठी वस्ती होती. त्या वस्तीच्या मध्यभागी भिकारदास सराफांचा भलामोठा बांगला होता.

भिकारदास सराफ नेहमी गरिबांना, साधू-संतांना अन्नदान करायचे, त्यांना हवी ती मदत करायचे. भिकारदास यांच्या दानशूर वृत्तीमुळे येथील परिसरात ते खूप प्रसिद्ध होते. त्याकाळी त्यांनी या परिसरात हनुमानाचे मंदिर बांधले होते, त्यामुळे भिकारदास सराफांनी बांधलेल्या मंदिराला भिकारदास मारुती असे नाव देण्यात आले. आजही हे मंदिर याच नावाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर बांधले त्या काळात या ठिकाणी एक बाग होती, परंतु काळाच्या ओघात त्या जागेवर काही वास्तू आणि धर्मशाळा बांधण्यात आल्या. या मंदिरात हनुमान जयंती, राम नवमी, गुरुपौर्णिमा, दास नवमी हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

हेही वाचा: पुण्यातील ‘या’ देवीला चतु:श्रृंगी नाव कसं पडलं? जाणून घ्या या नावामागची रंजक गोष्ट

याच मंदिरात भारतातील एकमेव नारदमुनींचेही मंदिर

भिकारदास मारुतीचे मंदिर खूप मोठे असून मंदिरातील मारुतीची मूर्ती उभी आहे. मूर्तीचे स्वरुप खूप सुंदर असून डोळे अगदी सजीव असल्यासारखे वाटतात. या मूर्तीची उंची ही साधारण तीन ते साडेतीन फूट अशी आहे. शिवाय या भिकारदास मारुती मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचेदेखील मंदिर आहे; तसेच येथे भारतातील एकमेव असे नारदमुनींचे मंदिरही उभारण्यात आले आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did the 150 to 0 year old bhikardas maruti temple in pune get this name know the interesting story behind this name sap