मोठ्या शहरांमध्ये कोणत्याही वस्तुची खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटकडे धाव घेतली जाते. सुपरमार्केटमध्ये सर्व वस्तु उपलब्ध असतात. अगदी महिन्याच्या किराणापासून ते कपडयांपर्यंत सर्व वस्तु एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने अनेकजण सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्याला प्राधान्य देतात. सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसतात हे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. पण यामागचे कारण काय हे अनेकांना माहित नसते. यामागे एक रंजक कारण आहे, काय आहे ते कारण जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात?

आणखी वाचा: रेल्वेरुळाशेजारी का असतात असे बॉक्स? जाणून घ्या याचे महत्त्व

सुपरमार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करुन ही रचना ठरवण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर आपण अनेकदा तिथेच रमून जातो. कारण तिथे खिडक्या नसल्याने आपला बाहेरच्या जगाशी पुर्णपणे संपर्क तुटतो. ग्राहकांनी संपुर्ण लक्ष खरेदीमध्ये असावे, आजुबाजुची दुकानं पाहून त्यांचे लक्ष विचलित होऊ नये हे सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसण्यामागचे हे मुख्य कारण आहे.

सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसल्यामुळे बाहेर घडणाऱ्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. बाहेर खूप पाऊस पडत आहे, अंधार पडला आहे अशा गोष्टी न समजल्याने ग्राहक घरी जाण्याची घाई करत नाहीत आणि जास्त वेळ तिथे खरेदी करण्यात घालवतात. अशाप्रकारे ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करून सुपरमार्केटची रचना केलेली असते.

आणखी वाचा: ट्रेनवर असणाऱ्या या झाकणांचा उपयोग काय असतो? जाणून घ्या याचे महत्त्व

काही वस्तु किंवा खाद्यपदार्थ असे असतात ज्यांच्यावर थेट सुर्यप्रकाश पडल्यास ते खराब होण्याची शक्यता असते. अशा वस्तु सुपरमार्केटमध्येही उपलब्ध असतात. जर सुपरमार्केटमध्ये खिडक्या असतील तर त्यांमधून येणारा सुर्यप्रकाश अशा वस्तुंसाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसण्यामागे हे देखील एक कारण आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do supermarkets dont have windows know the reason behind it pns
First published on: 10-12-2022 at 14:48 IST