Costliest Liquid in The World: विंचू हा पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. त्याने दंश केल्यावर काही मिनिटांमध्ये माणसाचा जीव जाऊ शकतो. विषारी प्राणी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर साप येतो. पण काही विंचवाच्या प्रजाती या सापांपेक्षा जास्त खतरनाक असतात. त्याच्या विषाचा प्रभाव सापांमध्ये आढळणाऱ्या विषाच्या तुलनेमध्ये अधिक असतो. विंचू प्रामुख्याने जंगलांमध्ये, वाळवंटांमध्ये आढळतात. जर चुकून एखाद्या व्यक्तीला विंचवाचा दंश झाला, तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार होणे आवश्यक असते. अशा वेळी इतर प्रजातींच्या विंचवाच्या विषाचा वापर उपचारांसाठी केला जातो. यामुळे या जीवघेण्या द्रव्याला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. जगातील सर्वात महाग द्रव्य (Liquid) हे एका विंचवाचे विष आहे. या विंचवाच्या प्रजातीबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेथस्टॉल्कर स्कॉर्पियन (Deathstalker scorpion) या प्रजातीच्या विंचवामध्ये असणारे विष हे सर्वात धोकादायक द्रव्यांपैकी एक आहे. त्यासह ते जगातील सर्वात महाग द्रव्य आहे असे मानले जाते. Brittanica.com च्या मते, डेथस्टॉल्कर स्कॉर्पियनच्या विषाची किंमत प्रति गॅलन ३९ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. या प्रजातीचा एक विंचू एका वेळेला फक्त दोन मिलीग्रॅम विष तयार करत असतो. एक गॅलन विष साठवण्यासाठी विंचवांमार्फत तब्बल २.६४ दशलक्ष वेळा विष काढून साठवले जाते. Business Insider च्या अहवालानुसार, या प्रजातीच्या विंचवाच्या विषाच्या एका थेंबाची किंमत १३० डॉलर म्हणजे दहा हजार रुपये इतकी आहे. यावरुन हे विष किती महाग आहे याचा अंदाज येतो.

आणखी वाचा – अबब! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

डेथस्टॉल्कर स्कॉर्पियनच्या विषाची किंमत इतकी जास्त का आहे?

ही विंचवाची प्रजात उत्तर आफ्रिका आणि मध्य-पूर्व आशिया खंडामध्ये आढळते. सहारा, अरबी, थार वाळवंट आणि मध्य आशियाच्या पट्ट्यामध्ये डेथस्टॉल्कर स्कॉर्पियन सहज सापडतात. यांच्या विषाचा वापर अनेक गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये केला जातो. म्हणून हे विष खूप जास्त महाग आहे. डेथस्टॉल्कर स्कॉर्पियनच्या विषामध्ये आढळणारे क्लोरोटॉक्सिन, चेरीब्डोटॉक्सिन, सायलेटॉक्सिन आणि अ‍ॅजिटोक्सिन असे न्यूरोटॉक्सिन आढळतात. कर्करोगाच्या गाठींवरील उपचार, मलेरियाच्या गंभीर उपचारांमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. ब्रेन ट्यूमर झालेल्या व्यक्तीच्या उपचारांमध्ये या विषाचा समावेश केला जातो. मधुमेहासाठीच्या उपचारांमध्येही त्याची मदत होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is deathstalker scorpion venom the costliest liquid in the world know the reason yps