समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे. समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. समुद्रात इतके मीठ कोठून आले तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या वैज्ञानिक उत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Christmas in December : ख्रिसमस हा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?

आपल्या पृथ्वीवर जवळपास ७० टक्के पाण्याचा साठा आहे. त्या साठ्यापैकी ९७ टक्के पाणी समुद्रात आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, महासागरामध्ये इतकं मीठ आहे की जर पृथ्वीवरील महासागरातून संपूर्ण मीठ बाहेर काढलं आणि जमिनीवर पसरवले तर त्याचे जवळपास ५०० मीटर उंच थर बनलतील.

समुद्रात मीठ कुठून येते?

समुद्रात नेमकं मीठ येतं कुठून? समुद्रात दोन स्त्रोतांद्वारे मीठ येतं. महासागरात बहुतेक मीठ नद्यांमधून येते. पावसाचे पाणी थोडे अम्लीय असते. जेव्हा हे पाणी जमिनीवरील खडकांवर पडते तेव्हा त्यातून तयार होणारे आयन नद्यांमध्ये मिसळते आणि ते पाणी नद्यांवाटे महासागरात पोहोचते. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.

हेही वाचा- साखर खाल्ल्याने खरंच मधुमेह होतो? काय आहे सत्य, घ्या जाणून

समुद्रात येणारा मीठाचा आणखी एक स्त्रोत आहे, तो म्हणजे समुद्रतळातून येणारा थर्मल द्रव. हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात. या छिद्रे आणि भेगांद्वारे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात आणि पाणी खारट बनते.

हेही वाचा- …म्हणून टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानातील लाइट्स बंद करतात; खरं कारण जाणून अचंबित व्हाल!

समुद्राच्या पाण्याची क्षारता एकसमान नसते. तापमान, बाष्पीभवन आणि पर्जन्यमानामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये फरक दिसून येतो. विषुववृत्त आणि ध्रुवाजवळील प्रदेशात खारटपणाचे प्रमाण खूप कमी आहे. पण इतर ठिकाणी पाण्यात मीठाचे प्रमाण जास्त आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the ocean water salty know the resone dpj