चित्रपट असो किंवा खरे आयुष्य एखादा मुलगा मुलीला प्रपोज करत असेल तर त्याने गुडघ्यावर बसून प्रपोज करावे, अशी इच्छा त्या मुलीसह प्रत्येकाचीच असते. पण अशी गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याची सुरुवात कशी झाली? अगदी प्रथेप्रमाणे पालन करण्यात येणाऱ्या या पद्धतीमागे नेमके कारण काय हे अनेकांना माहित नसते. यामागे एक रंजक कारण आहे, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याची सुरूवात कशी झाली?

आणखी वाचा: सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित

गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याच्या या पद्धतीचा कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही. पण अशाप्रकारे प्रपोज करणे म्हणजे वचन देण्याचे प्रतीक मानले जाते. तज्ञांच्या मतानुसार ही प्रथा मध्ययुगीन काळापासून सुरू झाली. त्या काळात उच्चभ्रू महिलांसमोर योद्धे गुडघे टेकत असत. हा त्याकाळातील एक प्रोटोकॉलचा भाग असल्याचे म्हणता येईल.

त्या काळातील अनेक चित्रांमध्ये शूरवीरांनी त्यांच्या राजासमोर किंवा प्रतिष्ठित व्यक्तींसमोर गुडघे टेकल्याचे दृश्य दिसत आहे. हे समोरच्या व्यक्तीला सम्मान देण्याचे प्रतीक मानले जात असे. त्याचेच अनुकरण आत्ताच्या काळात प्रपोज करताना केले जाते. गुडघ्यावर बसून प्रपोज करणे जोडीदाराप्रति असलेला सम्मान व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते.

आणखी वाचा: रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असते ही पिवळी पट्टी? जाणून घ्या यामागचे महत्त्वपूर्ण कारण

सहसा सर्वजण डाव्या गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. यामागचे कारण म्हणजे बहुतांश सर्वजण उजव्या हाताचा जास्त वापर करतात. त्यामुळे डाव्या गुडघ्यावर बसल्यानंतर उजव्या हाताने समोरच्या व्यक्तीला रिंग घालणे सोपे होते. अशाप्रकारे गुडघ्यावर बसून प्रपोज करणे समोरच्या व्यक्तीबद्दल असणाऱ्या सम्मानाचे प्रतिक मानले जाते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why there is tradition of sitting on knee while proposing know reason behind it pns