सायकल सदृश पर्यावरणस्नेही मोटार
मार्क स्टेवर्टने ‘एएलएफ बाइक’ म्हणजे सायकल वजा मोटार रस्त्यावर आणली तेव्हा तिच्या निळ्या दिव्यांनी सर्वाच्या नजरा वेधल्या गेल्या, पण ती दिसायला मोटार असली तरी प्रत्यक्षात सायकल आहे. स्टेवर्ट हा शाळेतील मानससल्लागार असून त्याने ही सायकलसदृश गाडी इस्टकोस्ट ग्रीनवे वरून १२०० मैल चालवली. डय़ुरहॅम येथून सुरू केलेला त्याचा प्रवास रेस्टन येथे संपला. रोज ६० मैल अंतर ते कापत होते. एएलएफ किंवा ऑरगॅनिक ट्रान्सिट व्हेइकल ही प्रदूषणमुक्त मोटार आहे व त्याला दुरूस्ती, निगा,विमा काही लागत नाही, काहीवेळा तिचा टायर बदलावा लागतो इतकेच. तिची किंमत ५००० डॉलर आहे.
वर्षांतील वैशिष्टय़पूर्ण गाडय़ा
बीएमडब्ल्यू महागणार
जर्मन मोटार उत्पादक कंपनी बीएमडब्लू त्यांच्या मिनी गाडीसह सर्व गाडय़ांच्या किमती सरसकट पाच टक्क्य़ांनी वाढवणार आहे, रूपयाची घसरण व त्यामुळे आयात किमतीत झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. बीएमडब्लूच्या भारतातील विभागाने असे जाहीर केले की, १५ ऑगस्टपासून गाडय़ांच्या किमतीत ही पाच टक्के दरवाढ लागू केली जाणार आहे. बीएमडब्लू इंडियाचे अध्यक्ष फिलीप व्हॉन सार यांनी सांगितले की, दरवाढीचे निर्णय आम्ही काळजीपूर्वक घेत असतो. सध्या बीएमडब्लूच्या सेडान ३,५,६, ७ मालिकेतील गाडय़ा, एसयुव्ही एक्स१,३,५ मालिकेतील गाडय़ा, एम मालिकेतील स्पोर्टस मोटारी यांच्या किमती २८.६ लाख ते १.७३ कोटी दरम्यान आहेत. मिनी मालिकेतील आटोपशीर गाडीच्या किमती २६.६ लाख ते ३७.५० लाख दरम्यान आहेत. दरम्यान, मर्सिडीझ बेन्झ कंपनीनेही त्यांच्या मोटारींच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एबेरहार्ड केर्न यांनी सांगितले की, रूपया कमकुवत झाल्याने किं मती वाढवणे आवश्यक ठरणार आहे. जर्मन मोटार उत्पादक ऑडी कंपनीने त्यांच्या गाडय़ांच्या किमती १५ जुलैपासून ४ टक्के वाढवल्या आहेत. त्यांच्या आर ८ गाडीची किंमत ४.४२ लाख आहे.
मारूतीची ‘स्मॉल कार ऑन डिझेल’