भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी शक्तिशाली ‘आयएनएस मुरमुगाओ’ही युद्धनौका सामील झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बलशाली युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द केल्याने, नौदलाच्या ताकद चांगलीच वाढली आहे. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचाली पाहता ही शक्तीशाली युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात येणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या या बलशाली युद्धनौकेच्या वैशिष्ट्यांबाबत जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १८ डिसेंबर रोजी स्वदेशी बनावटीची P15B स्टील्थ गाइडेड क्षेपणास्त्र विध्वंसक युद्धनौका ‘आयएनएस मुरमुगाओ’ही नौदलास समर्पित केली. नौदलाच्या अनुसार ही युद्धनौका रिमोट डिवाइस, आधुनिक रडार आणि जमिनीवरून जमीनवर व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे.

Mormugao हेच नाव का ठेवलं? –

नौदलाने सांगितलं की, या युद्धनौकेची लांबी १६३ मीटर, रुंदी १७ मीटर आणि वजन ७ हजार ४०० टन आहे. भारतीय बनावटीच्या सर्वात घातक युद्धनौकांमध्ये मुरमुगाओचा समावेश होऊ शकतो. मोरमुगाओ हे गोव्याच्या पश्चिम तटावरील ऐतिहासिक शहराचं नाव आहे. याच ऐतिहासिक बंदराच्या नावावर या क्षेपणास्त्र विध्वंसक युद्धनौकेचं नाव ठेण्यात आलं आहे. योगायोगाने ही युद्धनौका पहिल्यांदा १९ डिसेंबर २०२१ रोजी समुद्रात उतरली होती. ज्यादिवशी पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त होण्याला ६० वर्षे पूर्ण झाली होती.

राजनाथ सिंह काय म्हणाले? –

या युद्धनौकेबाबत राजनाथ सिंह म्हणाले, “MDSL द्वारे निर्मिती झालेली ही युद्धनौका आपल्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेचं मोठं उदाहरण देते. यात कोणतीही शंका राहत नाही की आगामी काळात आपण केवळ आपल्याच गरजेसाठी नाही तर जगभरातील गरजांसाठीही जहाजांची निर्मिती करू.”

सागरी हद्दीतील घुसखोरीला मिळणार जोरदार उत्तर –

नौदलाकडून सांगण्यात आले आहे की, पानबुडीविरोधी युद्ध क्षमता देशातच विकसित करण्यात आली आहे. या युद्धनौकेवर रॉकेट लाँचर, टॉर्पेडो लाँचर आणि एसएडब्ल्यू हॅलिकॉप्टरची यंत्रणा आहे. मुरमुगाओ युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धात बचाव करण्यास सक्षम आहे. त्यामुळे समुद्री हद्दीत होणाऱ्या सर्वप्रकारच्या घुसखोरीला आता भारतीय नौदलाकडून आणखी जोरदार उत्तर दिले जाणार आहे. सागरी क्षेत्रातील चीनची वाढती हालचाल पाहता भारत हिंद महासागरावर लक्ष केंद्रित करून आपली सागरी क्षमता वाढवत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained indian navy gets powerful ins mormugao what are the characteristics of the boat msr