विश्लेषण : फेसलिफ्ट व्हर्जन कार म्हणजे काय?

जेव्हा एखादी नवीन कार लॉन्च केली जाते तेव्हा ते कारचे फेसलिफ्ट व्हर्जन असल्याचे ऐकायला मिळते

facelift version car
(फोटो सौजन्य – PTI)

आजकाल जेव्हा जेव्हा एखादी नवीन कार लॉन्च केली जाते तेव्हा ते कारचे फेसलिफ्ट व्हर्जन असल्याचे ऐकायला मिळते. आतापर्यंत कार किंवा मॉडेल किंवा कारचे नवीन व्हर्जन असे शब्द ऐकले होते. पण आता फेसलिफ्ट मॉडेलचा उल्लेख करण्यात येतो.

फेसलिफ्ट मॉडेल म्हणजे काय?

जेव्हा कंपनी कारमध्ये काही बदल करते तेव्हा त्या मॉडेलला फेसलिफ्ट मॉडेल म्हणतात. म्हणजे, कार पूर्वीसारखीच राहते, फक्त बदलत्या फीचर्स आणि तंत्रज्ञानाला काळानुसार अपडेट करण्यासाठी, कंपनी कारच्या बाहेरील आणि आतील भागात थोडे बदल करते. त्याला कारचे फेसलिफ्ट मॉडेल म्हणतात. नुकत्याच लॉन्च झालेल्या मारुती बलेनो प्रमाणेच, कंपनीने त्यांच्या फ्रंट ग्रिल, बंपर आणि टेललाइट्स इत्यादी बदलल्या आहेत. आतील स्तरावर, ३६०-डिग्री व्ह्यू कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले आणि नवीन इन्फोटेनमेंट स्क्रीन लावण्यात आली आहे. परंतु कारची मूळ बॉडी आणि इंजिनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. म्हणूनच याला मारुती बलेनो फेसलिफ्ट मॉडेल म्हटले गेले.

फेसलिफ्ट मारुती बलेनो

दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्राने महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच केली तेव्हा ते कारचे नवीनच मॉडेल बनले. कारण नवीन कार मागील मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे बदलली आहे. ही एक प्रकारे जुन्या स्कॉर्पियोची दुरुस्ती होती आणि त्याला नवीन स्कॉर्पियो किंवा स्कॉर्पियोचे नवीन जनरेशन असे म्हटले गेले. २०२० मध्ये Hyundai Creta सोबतही असेच घडले, जेव्हा कंपनीने Creta चा जुना लुक पूर्णपणे बदलला आणि नवीन Creta एकदम नवीन कार सारखी दिसू लागली.

शिल्पा शेट्टीच्या नाकाची शस्त्रक्रियाही होती फेसलिफ्टिंग!

फेसलिफ्ट हा शब्द वैद्यकीय क्षेत्रातून आला आहे. जेव्हा प्लास्टिक सर्जरी दरम्यान एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काही किरकोळ बदल केले जातात तेव्हा त्याला फेसलिफ्टिंग म्हणतात. शिल्पा शेट्टीसाठी तिच्या नाकात किरकोळ बदल करणे किंवा अनुष्का शर्मासाठी ओठांवर काम करणे हे फेसलिफ्टिंग होते.

कंपनी नवीन कारऐवजी फेसलिफ्ट कार का आणते?

एखादी कंपनी आपले फीचर्स अपडेट करत असेल तर ती नवीन कार बनवते. त्यामध्ये डिझायनिंगपासून ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत खूप खर्च येतो. जेव्हा कंपनीची कार लोकप्रिय होते, तेव्हा त्या ब्रँडचे व्हॅल्यू वाढते. अशा परिस्थितीत, किंमत कमी ठेवण्यासाठी आणि ब्रँड व्हॅल्यूचे भांडवल करण्यासाठी, कंपनी नवीन कार आणण्याचे टाळते आणि ग्राहकांना अद्ययावत मॉडेल मिळत राहावे यासाठी फेसलिफ्ट मॉडेल आणते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained know what is the facelift version abn

Next Story
विश्लेषण : पीटर ब्रुक… रिक्त अवकाशात नजरबंदी करणारा जादूगार!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी