पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांची आई हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी एक ब्लॉग देखील लिहिला. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या काळजीवाहू स्वभावाबद्दल लिहिले. पंतप्रधान मोदींनी असेही सांगितले की आई नेहमीच माझ्यासह मित्रांबाबत प्रेमळ आणि काळजी घेणारी आहे. याच ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी त्याच्यांसोबत राहणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा अब्बास यांचाही उल्लेख केला आहे. आई हीराबेन यांनी अब्बास यांना मुलाप्रमाणे वाढवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र ‘अब्बास’ यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेर अब्बास कोण आहेत, कुठे आहेत? याबाबती माहिती समोर आली आहे.

“अब्बास त्यांच्या वडिलांसोबत जवळच्या गावात राहत होता. मात्र वडिलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर माझे वडील अब्बासला घरी घेऊन आले. अब्बास यांनी शिक्षण पूर्ण करेपर्यंत ते  आमच्या कुटुंबासोबत राहिले,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

PM Modi’s Mother 100th Birthday: हिराबेन मोदी मार्ग! पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या दिवशी अनोखा सन्मान

अब्बास कुठे आहेत आणि काय करत आहेत?

पंतप्रधान मोदींचे बालपणीचे मित्र अब्बास हे सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे त्यांच्या मुलासोबत राहतात. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अब्बास यांना दोन मुले आहेत. धाकटा मुलगा ऑस्ट्रेलिया आणि मोठा मुलगा गुजरातच्या कासिम्पा गावात राहतो. अब्बास आज ६४ वर्षांचे झाले आहेत. अब्बास हे गुजरात सरकारमध्ये अन्न व पुरवठा विभागात होते. काही महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले आहेत. अब्बास यांनी नोकरीच्या काळात वडनगर येथे घर बांधून घेतले.

पंतप्रधान मोदींनी मातोश्रींच्या वाढदिवासानिमित्त लिहिलेला ब्लॉग

पंतप्रधान मोदींच्या भावासोबत शिकत होते अब्बास

पंतप्रधानांचे बंधु पंकजभाई मोदी यांच्यासोबत अब्बास शिक्षण घेत होते. पंजकभाईंनी सांगितले की, अब्बास ज्या गावात राहत होता तेथे शाळा नव्हती. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा अभ्यास मागे राहिला असता  म्हणून वडिलांनी त्यांना सोबत आणले. अब्बासने आठवी आणि नववीचे शिक्षण आमच्यासोबत राहून पूर्ण केले.

पंतप्रधान मोदींच्या भावाने सांगितले की, अब्बास यांना त्यांची आई हीराबेन त्यांच्या मुलांप्रमाणे वागवत होती. ईदच्या दिवशी ती तिच्या आवडीचे जेवण बनवायची, तर मोहरमच्या दिवशी तिला काळे कपडे घालायला द्यायचे. अब्बास खूप चांगला आहेह. तो पाच वेळा नमाज पढत असे. तो मोठा झाल्यावर त्याने हज यात्राही केली.

“आई-वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर अनिवार्य आहे का?”; मोदींच्या आईच्या वाढदिवशीच महाराष्ट्रातील नेत्याचा प्रश्न

वडिलांनी अब्बासला घरी आणले – पंतप्रधान मोदी

मित्राच्या अकाली मृत्यूनंतर वडिलांनी अब्बास यांना आमच्या घरी आणले होते. एकप्रकारे अब्बास आमच्या घरी राहूनच अभ्यास करत असे. आई आम्हा सर्व मुलांप्रमाणे अब्बासची खूप काळजी घ्यायची. माझ्या आईने बनवलेले पदार्थ त्यांना खूप आवडायचे, असे मोदींनी म्हटले आहे.

ईदच्या दिवशी अब्बाससाठी आई आवडीचे पदार्थ बनवायची – पंतप्रधान मोदी

आपल्या ब्लॉगमध्ये अब्बास यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘दुसऱ्यांना आनंदी पाहून आई नेहमी आनंदी असते. घरात जागा कमी असेल, पण त्याचे मन खूप मोठे आहे. “ईदच्या दिवशी आई अब्बाससाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असे. सणासुदीच्या काळात आजूबाजूची काही मुलं आमच्या घरी येऊन जेवायची. माझ्या आईच्या हाताने बनवलेला पदार्थही त्यांना खूप आवडायचा. आमच्या घराभोवती कोणीही ऋषी-मुनी यायचे तेव्हा आई त्यांना घरी बोलावून खाऊ घालायची. ते जायला निघाले की तेव्हा आई स्वतःसाठी नाही तर आम्हा भावा-बहिणींसाठी आशीर्वाद मागायची. माझ्या मुलांना आशीर्वाद दे म्हणून ती त्यांना सांगायची. माझ्या मुलांमध्ये भक्ती आणि सेवाभाव रुजवण्यासाठी, त्यांना आशीर्वाद द्या, असे ती म्हणायची,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained pm modi childhood friend abbas mentioned in his blog abn