Iran vs Israel: इराण आणि इस्रायलमधील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावाने आता युद्धाचे रूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. या परिस्थितीत इराणने आपल्या सैन्यात मोठा बदल केला आहे. इराणचे कमांडर इन चीफ अयातुल्ला अली खामेनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये माजी संरक्षण मंत्री जनरल अमीर हतामी यांची इराणी सैन्याचे नवे प्रमुख कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इराणच्या राजधानीत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात देशाच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांची हत्या झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मेजर जनरल सय्यद अब्दुलरहीम मौसावी यांना सशस्त्र दलांचे प्रमुख बनवण्यात आले आहे.

कोण आहेत अमीर हतामी?

हुसेन देहघान यांच्या जागी ५९ वर्षीय अमीर हतामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१३ ते २०२१ पर्यंत इराणचे संरक्षण मंत्री होते. आता वाढत्या प्रादेशिक तणावादरम्यान त्यांनी देशाच्या नियमित लष्करी दलांचे नेतृत्व स्वीकारले आहे. हतामी यांनी इमाम अली ऑफिसर्स अकादमी, एजेए युनिव्हर्सिटी ऑफ कमांड अँड स्टाफ आणि नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांनी हतामी यांच्या समर्पणाची, क्षमता आणि अनुभवाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, हतामी यांच्या नेतृत्वाखाली सैन्यात परिवर्तनकारी आणि क्रांतिकारी बदल होतील. याशिवाय इस्रायली हल्ल्यात सशस्त्र दलांचे माजी प्रमुख (CSAF) जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांच्या मृत्यूनंतर खामेनी यांनी मेजर जनरल सय्यद अब्दुलरहीम मौसावी यांची सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. आदेशात खामेनी यांनी म्हटले आहे की, “लेफ्टनंट जनरल मोहम्मद हुसेन बघेरी यांच्या निधनानंतर मेजर जनरल सय्यद अब्दुलरहीम मौसावी यांच्या प्रशंसनीय सेवा आणि अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सशस्त्र दलांचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.”

मोहम्मद पाकपूर यांची आयआरजीसी (Islamic Revolutionary Guard Corps)चे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती

इस्रायली हल्ल्यात लेफ्टनंट जनरल हुसेन सलामी यांच्या मृत्यूनंतर, मेजर जनरल मोहम्मद पाकपूर यांची आयआरजीसीच्या कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. खामेनी म्हणाले की, “मेजर जनरल मोहम्मद पाकपूर यांच्या प्रशंसनीय सेवा आणि मौल्यवान अनुभवामुळे त्यांना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

  • इराण-इस्त्रायल संघर्ष:
  • इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह सहा अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू, आण्विक तळही उद्ध्वस्त
  • इराणचं इस्रायलला प्रत्युत्तर! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे
  • इराणच्या अयातुल्ला खामेनींचा इस्रायलला इशारा
  • इस्रायल-इराण संघर्षात आतापर्यंत ८१ बळी
  • संयुक्त राष्ट्राचं दोन्ही देशांना आवाहन
  • इराणला मोठी किंमत मोजावी लागेल – इस्रायलचे संरक्षण मंत्री
  • इस्रायलने सात महिन्यांपूर्वीच आखलेली योजना
  • इस्रायलच्या हल्ल्यात पाच इराणी अधिकारी व सहा अणू शास्त्रज्ञांचा मृत्यू, देशभरात ७८ बळी

अली शादमनी पीबीयूएचचे कमांडर

लेफ्टनंट जनरल घोलामाली रशीद यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली खामेनी यांनी मेजर जनरल अली शादमनी यांची खातम अल-अंबिया (PBUH) केंद्रीय मुख्यालयाचे कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

या अधिकाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू

इस्रायली हल्ल्यात इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये आयआरजीसी कमांडर मेजर जनरल हुसेन सलामी, इराणच्या सशस्त्र दलांचे माजी प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचा समावेश आहे. याशिवाय, आयआरजीसी हवाई दलाचे प्रमुख अमीर अली हाजीजा देह यांचेही निधन झाले.

आण्विक स्थळांवर हल्ले

शुक्रवारी इस्रायलने इराणच्या आण्विक स्थळांवर हल्ला केला. इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रे इस्रायल आणि जगासाठी धोका निर्माण करतात. प्रत्युत्तरादाखल, इराणने तेल अवीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले.

इराणचे लष्करप्रमुख सय्यद अब्दुलरहीम मौसावी आणि लष्करप्रमुख मेजर जनरल अमीर हतामी फोटो – एएनआय

इस्रायल-इराण संघर्ष

इस्रायलने अण्वस्त्रांचा विकास थांबवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दीर्घकालीन शत्रूवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. शनिवारी सकाळी इराण आणि इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले झाले. इराणची राजधानी तेहरानमध्ये असंख्य स्फोट ऐकू आल्याचे तेथील तस्निम वृत्तसंस्थेने सांगितले आहे. शुक्रवारी इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला हादरवून टाकले. ही देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी एक महत्त्वाची चाचणी होती. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलला अनेक प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये कमी पल्ल्याच्या रॉकेट, मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, हल्ला करणारे ड्रोन आणि गाझा, लेबनॉन, सीरिया, इराक, येमेन आणि इराणमधून प्रक्षेपित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री डागण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी आतापर्यंतच्या सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आव्हान इराणसमोर निर्माण केले.

इस्रायलमध्ये इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ३४ जण जखमी झाले आहेत, तर इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात ७८ जणांचा मृत्यू झाला, तर ३२९ जण जखमी झाले आहेत.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे आवाहन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणच्या लोकांना सांगितले की, “जवळपास ५० वर्षांपासून तुमच्यावर अत्याचार करणारी इस्लामिक राजवट इस्रायल राज्याला नष्ट करण्याची धमकी देत आहे.” नेतान्याहू यांनी इराणी जनतेला आवाहनही केले. ते म्हणाले की, “तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही आवाज उठवावा. येथील राजवटीची पकड आता कमकुवत होत चालली आहे. हीच योग्य वेळ आहे, जेव्हा तुम्ही या जुलमी सरकारविरुद्ध एकत्र उभे राहू शकता. यावेळी नेतान्याहू यांनी इराणमधील महिला, नागरिकांचे जीवन आणि स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांचाही उल्लेख केला. यापूर्वी इस्रायल डिफेन्स फोर्सने इराणमधील शेकडो ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केला होता