इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा या वर्षीचा हंगाम तोंडावर आला आहे. हे सर्व सामने ‘जिओ सिनेमा’ अॅपवर मोफत पाहता येणार आहेत. असे असतानाच आता जिओने ब्रॉडबँड इंटरनेट सेवा क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. जिओने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन लॉंच केला आहे. ‘भारती एअरटेल’शी स्पर्धा करण्यासाठी जिओने २०० रुपयांपेक्षा कमी असलेला प्लॅन आणल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल तोंडावर असताना निर्णय

या वर्षी जिओ सिनेमावर आपयीएलचे सामने मोफत दाखवले जाणार आहेत. या क्षेत्रात अगोदरच ‘स्टार इंडिया’चे प्रस्थ आहे. स्टार इंडियाकडे आयपीएलच्या प्रक्षेपणाचे अधिकार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तसेच ऑनलाईन स्ट्रिमिंगदरम्यान दिल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> Congress and OBC : ओबीसी समाजाच्या योजनांचे श्रेय लाटण्यात काँग्रेस अपयशी ठरल्यामुळे भाजपाचा लाभ?

जिओने ब्रॉडबँडसाठी आणलेला नवा प्लॅन काय आहे?

जिओने आपल्या नव्या ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅनला ‘ब्रॉडबँड बॅकअप प्लॅन’ असे नाव दिले आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना १९८ रुपयांत प्रति महिना १० एमबीपीएस प्रति सेकंद याप्रमाणे इंटरनेटचा स्पीड दिला जाईल. याआधी जिओ ब्रॉडबँडचा कमी किमतीचा प्लॅन ३९९ रुपयांचा होता. सोबतच कंपनीने इंटरनेटचा स्पीड वाढवण्याचाही पर्याय दिला आहे. या पर्यायानुसार जिओ ब्रॉडबँड वापरकर्त्यांना इंटरनेटचा स्पीड १ ते ७ दिवसांसाठी ३० ते १०० एमबीपीएसपर्यंत वाढवता येऊ शकतो. त्यासाठी ग्राहकांना २१ ते १५२ रुपयांपर्यंत जादा रक्कम मोजावी लागणार आहे. सध्या जिओकडे ८३ लाख होमलाईन नेटवर्क म्हणजेच ब्रॉडबँड ग्राहक आहेत. हे प्रमाण एकूण बाजाराच्या ३०.६ टक्के आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : IMF बेलआऊट म्हणजे काय?, ते देशाला कधी मिळते आणि कर्ज देण्याच्या अटी काय?

एअरटेलचा सर्वात कमी किमतीचा प्लॅन ६९९ रुपयांचा

ब्रॉडबँडसाठी असलेल्या प्लॅन्सची तुलना करायची झाल्यास सध्या जिओ सर्वाधिक कमी किमतीचा प्लॅन देत आहे. सध्या एअरटेलचा सर्वात कमी किमतीचा प्लॅन ६९९ रुपयांचा आहे. या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना एका महिन्यासाठी ४० एमबीपीएसप्रमाणे इंटरनेटचा स्पीड मिळतो. यामध्ये मनोरंजनासाठी काही अॅप्सचाही अॅक्सेस दिला जातो.

हेही वाचा >>>विश्लेषण : राजस्थानमधील ‘आरोग्य अधिकार विधेयका’ला डॉक्टरांचा विरोध, नेमके कारण काय?

अन्य कंपन्या आपल्या प्लॅन्सचे दर कमी करण्याची शक्यता

दरम्यान, जिओच्या या निर्णयामुळे ब्रॉडबँड इंटरनेट विश्वात मोठे बदल होऊ शकतात. जिओशी स्पर्धा करण्यासाठी भारती एअरटेलसारख्या कंपन्या आपल्या प्लॅन्सचे दर कमी करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio lowered broadband plans competition for bharti airtel prd
Show comments