आजारी व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी, त्यासाठी औषधोपचार घेण्याची किंवा गोळी गिळण्याची काही योग्य पद्धत आहे का? याबाबत एक नवीन संशोधन करण्यात आलं आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासात असं आढळून आले आहे की, उजवीकडे झुकून गोळी गिळल्याने ती रक्तप्रवाहापर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे उजवीकडे झुकून गोळी गिळणे, ही गोळी गिळण्याची योग्य पद्धत असल्याचे निष्कर्ष जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी काढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजेक्शन किंवा इतर मार्गाने औधषोपचार घेण्याऐवजी तोंडाच्या मार्गातून घेतलेला औषधोपचार जास्त सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. बहुतांशी रुग्ण अशाच प्रकारे औषधोपचार घेत असतात. गोळी गिळल्यानंतर आतड्यांद्वारे ती रक्तात शोषली जाते आणि त्यानंतर औषधांचा परिणाम दिसायला लागतो. पण संबंधित गोळी रक्तात शोषली जाण्यापूर्वी ती पोटातून जावी लागते. जठराच्या खालचा भाग ज्याला आपण अँट्रम म्हणतो, हा भाग पायलोरसद्वारे लहान आतड्याशी जोडलेला असतो. अन्न पचनाची क्रिया घडत असताना हा भाग उघड-बंद होत असतो. त्यामुळे उजव्या बाजुला झुकून गोळी गिळल्याने ते लवकरात लवकर अँट्रमपर्यंत पोहोचते. परिणामी गोळी पोटात विरघळून रक्तात मिसळण्याची प्रकिया जलद घडते.

संशोधनातील निष्कर्ष…

यासाठी संशोधकांनी चार पद्धतीने औषधोपचार घेण्याचा प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी १. सरळ २. उजवीकडे झुकणे ३. डावीकडे झुकणे आणि ४. मागच्या बाजुने झुकणे अशा चार पद्धतींचा वापर केला. यामध्ये उजवीकडे झुकल्याने गोळी पोटात विरघळण्याचा वेग अधिक होता. तर डावीकडे झुकल्याने गोळी पोटात विरघळण्यास आणि रक्तात शोषून घेण्यास लक्षणीय वेळ लागला, असे निष्कर्ष अभ्यासातून समोर आले आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : आपण खूप विचार केल्यानंतर थकवा का येतो? नेमकं घडतं काय? अभ्यासातून समोर आली नवी माहिती!

जेएचयू संकेतस्थळानुसार, “उजव्या बाजूला झुकून गोळी गिळल्याने ती विरघळण्यासाठी १० मिनिटे लागली, तर ती सरळ स्थितीत घेतल्यानंतर विरघळण्यासाठी २३ मिनिटं लागली. मात्र, डाव्या बाजूला झुकून गोळी गिळल्यास ती विरघळण्यास सुमारे १०० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला.”

हेही वाचा- विश्लेषण: पोलिओ पुन्हा एकदा चर्चेत का? सांडपाण्यातून त्याचा फैलाव कसा होत आहे? कितपत धोका?

“वृद्ध, बैठी किंवा अंथरुणाला खिळलेले रुग्ण डावीकडे किंवा उजवीकडे झुकले तरी त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो,” असं मत संबंधित अभ्यासाचे एक लेखक रजत मित्तल यांनी मांडलं आहे. ते जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात अभियंता आणि फ्लुइड डायनॅमिक्सचे तज्ज्ञ देखील आहे. संबंधित संशोधन गेल्या आठवड्यात ‘फिजिक्स ऑफ फ्लुइड्स’मध्ये प्रकाशित झालं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lean right is good way to take pill new study rmm
First published on: 19-08-2022 at 17:41 IST