Sebi’s new verified UPI IDs: गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या बोगस ब्रोकर्सना रोखण्यासाठी सेबीने नवीन प्रणाली तयार केली आहे. शेअर बाजारातील नोंदणीकृत नसलेल्या संस्थांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी भारतीय सेक्युरिटीज अॅंड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) त्यांच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांसाठी नवीन यूपीआय प्रणाली विकसित करत आहे. ही पेमेंटची एक नवीन आणि सुरक्षित पद्धत असेल. यामध्ये सेबीकडून नोंदणीकृत ब्रोकर्सना गुंतवणूकदारांकडून पेमेंट मिळविण्यासाठी एक विशेष यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)आयडी जारी केला जाईल. नवीन प्रणालीच्या मदतीने गुंतवणूकदार विश्वसनीय संस्था आणि नोंदणीकृत मध्यस्थी ओळखू शकतील. या प्रक्रियेद्वारे गुंतवणूकदारांना पैसे देण्यापूर्वी ते कायदेशीर सेबी-नोंदणीकृत मध्यस्थींना ओळखू शकतील. नोंदणीकृत मध्यस्थींचे यूपीआय आयडी किंवा बॅंक तपशिलांची सत्यता पडताळण्यासाठी बाजार नियामक ‘सेबी चेक’ नावाची एक नवीन सुविधादेखील विकसित करत आहेत. या दोन्ही सुविधा सुरू करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
नवीन यूपीआय पेमेंट प्रणाली काय आहे?
गुंतवणूकदरांना अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि सेक्युरिटीज मार्केटमध्ये अनधिकृतपणे पैसे गोळा करण्यापासून रोखण्यासाठी सेबीने एक संरचित आणि प्रमाणित यूपीआय अॅड्रेस मेकॅनिझम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांच्या सर्व नोंदणीकृत गुंतवणूकदार मध्यस्थांसाठी विशेष ‘@valid’ असे अधिकृत टॅग दिले जाणार आहे.
गुंतवणूकदारांना योग्य ब्रोकरचा पत्ता कळेल
‘SEBI चेक’ गुंतवणूकदारांना QR कोड स्कॅन करून किंवा यूपीआय आयडी मॅन्युअली एंटर करून किंवा नोंदणीकृत ब्रोकरचा खाते क्रमांक आणि IFSC कोड एंटर करून ब्रोकर बरोबर आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत करेल. स्टॉक ब्रोकर, डिपॉझिटरी सहभागी, संशोधन विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट (REITs) यांसारख्या गुंतवणूकदारांना तोंड देणाऱ्या मध्यस्थांच्या सुमारे १० श्रेणी नवीन हँडलसाठी अर्ज करू शकतील. या संस्था एक विशिष्ट नाव निवडतील आणि त्यानंतर त्यांच्या विभागाचे प्रतिनिधित्व करणारे संक्षिप्त नाव निवडतील. उदाहरणार्थ, स्टॉक ब्रोकरच्या वापरकर्ता नावात ‘BRK’ प्रत्यय असेल, तर म्युच्युअल फंडाच्या वापरकर्ता नावात ‘MF’ असेल. ‘@Valid’ हँडल बँकांच्या वापरकर्ता नावाशी जोडले जातील. हे हँडल NPCI द्वारे दिले जातील.
- सुरक्षितता: नोंदणीकृत मध्यस्थांसाठी खास UPI आयडी असल्याने, गुंतवणूकदार चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवण्याची शक्यता कमी होईल
- पारदर्शकता: ‘@valid’ टॅग आणि ‘सेबी चेक’ (SEBI Check) यासारख्या सुविधांमुळे गुंतवणूकदारांना UPI आयडीची सत्यता तपासता येईल
- फसवणूक टाळणे: नवीन प्रणालीमुळे फसवणूक आणि सायबर गुन्हे टाळता येतील
गुंतवणूकदारांसाठी काय बदल असतील?
गुंतवणूकदारांना पेमेंट प्राप्त करणारी संस्था सेबीच्या कक्षेत कायदेशीर संस्था आहे की नाही हे पडताळता येईल. त्यांना हिरव्या त्रिकोणाच्या आत एक पांढरा ‘थम्स अप’ चिन्ह दिसेल. त्यामार्फतही पडताळणी करता येईल. गुंतवणूकदार NEFT, RTGS, UPI किंवा चेकसारखे कोणतेही पेमेंट पर्याय निवडू शकतात. तसंच यूपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी त्यांनी फक्त “@valid” आयडी असलेलेच आयडी निवडावेत. हे यूपीआय आयडी फक्त गुंतवणूकदारांकडून पेमेंट गोळा करण्यासाठी वापरले जातील. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) साठी निधी हस्तांतरणाची सध्याची पद्धत कोणत्याही व्यत्ययापासून वाचू शकेल. नवीन एसआयपी किंवा एसआयपीचे नूतनीकरण आणि विस्तार नवीन यूपीआय आयडी वापरून केले जाईल. यूपीआयद्वारे भांडवली बाजार व्यवहारांसाठी कमाल मर्यादा पाच लाख रुपये आहे.
जर एखाद्या फसव्या व्यक्तीची नोंदणी झाली तर काय होईल?
फक्त खऱ्या संस्थाच नोंदणी करू शकतील. ५२ स्व-प्रमाणित (self-certified) सिंडिकेट बँका आहेत, ज्यांना NPCI द्वारे ‘@valid’ हँडल वाटप दिला जाईल. या बँका NPCI ला नवीन यूपीआय हँडल जारी करण्याची विनंती करतील. मध्यस्थांना यूपीआय आयडी मिळविण्यासाठी त्यांच्या विद्यमान बँक खात्यांचा आणि नवीन खात्यांचा वापर करता येईल. कोणत्याही संस्थेला यूपीआय आयडी जारी करण्यापूर्वी बँकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. सेबीच्या एसआय पोर्टलद्वारे पडताळणी केल्यानंतर ते संस्थांनी केलेल्या विनंतीची खातरजमा करतील. अनेक व्यवसाय खाती असलेल्या संस्थांना प्रत्येक खात्यासाठी एक युनिक यूपीआय आयडी मिळू शकेल.
जुने हँडल काढून टाकले जातील का?
सेबीच्या परिपत्रकानंतर ९० दिवसांच्या आत बँकांकडून नवीन यूपीआय आयडीचे वाटप केले जातील. १८० दिवसांनंतर (अंदाजे डिसेंबरच्या मध्यात) मध्यस्थांकडून जुने आयडी बंद केले जातील. नवीन आयडी लाईव्ह झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी ही नवीन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी दिला जाईल.
सेबीचे नियंत्रण कोणत्या प्रकारचे असेल?
गुंतवणूकदारांना पेमेंट करण्यापूर्वी एखाद्या घटकाची सत्यता पडताळण्यास मदत करण्यासाठी बाजार नियामक अतिरिक्त सुरक्षा स्तर (सेबी तपासणी) प्रदान करते. हे हँडल १ ऑक्टोबरपासून लाईव्हदेखील होईल. या हँडलद्वारे, गुंतवणूकदार क्यूआर कोड स्कॅन करून किंवा यूपीआय आयडी मॅन्युअली एंटर करून ते पडताळू शकतील. तसंच मध्यस्थांच्या बँक तपशिलांची पडताळणीदेखील करता येईल. दरम्यान, हे हँडल यूपीआय अॅपसोबत संयुक्त केलेले नाही