गेल्या आठवड्यात जागतिक आर्थिक परिषदे (WEF) च्या वार्षिक बैठकीसाठी जागतिक नेते स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जमले होते. जागतिक सुरक्षा, चौथी औद्योगिक क्रांती आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेत १३० हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक व्यावसायिक आणि उद्योगमंत्री या परिषदेसाठी एकत्र आले होते. परंतु, आता जागतिक आर्थिक परिषद संपल्यानंतर त्यासंदर्भातील एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डेली मेल’च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, परिषदेच्या काळात स्विस आल्प्स शहर हे जगातील उच्चभ्रू लोकांच्या अमर्यादित लैंगिक क्रियाकलापांसाठी केंद्रस्थान होते. बातमीच्या वृत्तानुसार, हाय-प्रोफाइल बैठकीमुळे एस्कॉर्ट व्यवसायांकडे सेक्स पार्ट्यांची मागणी वाढली, ज्यामुळे वेश्या आणि ट्रान्सजेंडर महिलांच्या मागणीतही या काळात वाढ झाली होती. हा खळबळजनक अहवाल समोर येताच जगभरात हा चर्चेचा विषय ठरत आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

‘डेली मेल’च्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, परिषदेच्या काळात स्विस आल्प्स शहर हे जगातील उच्चभ्रू लोकांच्या अमर्यादित लैंगिक क्रियाकलापांसाठी केंद्रस्थान होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : महाकुंभमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे नक्की काय? याचे आयोजन नेहमी चर्चेचा विषय का ठरते?

दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत सेक्स पार्ट्यांमध्ये वाढ?

१९४० पासून स्वित्झर्लंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. जागतिक आर्थिक परिषदेला जगभरातील सेलिब्रिटी, पत्रकार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींसह सर्व स्तरांतील लोक हजेरी लावतात. कॉर्पोरेट आणि सार्वजनिक क्षेत्रावर या परिषदेचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. परंतु, ‘डेली मेल’च्या बॉम्बशेल अहवालाने स्विस आल्प्स शहरातील कार्यक्रमाविषयी एक धक्कादायक बाब उघड केली आहे. दावोस येथे असताना लैंगिक गोष्टींचे आकर्षण ही जगातील अनेक उच्चभ्रू लोकांच्या पसंतीची बाब झाली होती, असे या अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या मुली इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषक होत्या. या अहवालानुसार स्पष्ट झाले की, उपस्थितांसाठी एका कंपनीने अनेक महिलांचे एकाच वेळी बुकिंग केले होते.

‘Titt4tat’चे प्रवक्ते अँड्रेस बर्जर यांनी ‘MailOnline’ला सांगितले, “जागतिक आर्थिक परिषद सुरू झाल्यापासून, आम्ही दावोस आणि आसपासच्या परिसरात सुमारे ३०० महिला आणि ट्रान्स महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. २०२४ मध्ये हा आकडा १७० होता. अंदाजे ९० ग्राहकांनी ३०० एस्कॉर्ट्सचे बुकिंग केले होते.” अँड्रेस बर्जर म्हणाले की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सेक्स पार्ट्यांचे प्रमाण जास्त होते. बर्जरने मेलऑनलाइनला सांगितले, “बदल झालेल्या बाबी म्हणजे दावोस आणि आसपासच्या अनेक महिलांना आता एनडीएवर सही करावी लागेल. वाढती मागणी आणि पैसे बघता, महिला या करारावर स्वाक्षरी करतात. हे करार अनेकदा इंग्रजीत असतात. हॉलीवूडमधील सेक्स पार्ट्यांच्या अलीकडील वाढत्या आकर्षणाचा हा परिणाम आहे, असा आम्हाला संशय आहे.”

सर्वाधिक मागणी कशाची?

‘जागतिक आर्थिक परिषदे’च्या श्रीमंत ग्राहकांनी अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली. ‘डेली मेल’ला ‘स्विस एस्कॉर्ट अवंतगार्डे एजन्सी’च्या सुझॅनने सांगितले, “अनैसर्गिक लैंगिक संबंध ही खरं तर वारंवार मागणी केली जाणारी एक गोष्ट आहे. अशावेळी महिलांना हिंसाचारदेखील सहन करावा लागतो माझ्या अनुभवानुसार, पुरुषाचा व्यावसायिक/सामाजिक दर्जा जितका उच्च असेल, तितका त्यांचा महिलांवरील हिंसाचार वाढत जातो. एस्कॉर्ट व लेखक सलोम बाल्थस यांनी नोंदवले की, दावोस येथे उपस्थित असलेल्या काही गटांनी या सेवांची मोठ्या प्रमाणात मागणी केली होती.

कोटींमध्ये महिलांची बुकिंग

अहवालानुसार, काही महिला प्रत्येक बुकिंगसाठी ६.४५ लाख शुल्क आकारत होत्या; तर काही लोक महिलांची सोबत मिळावी यासाठी काही तासांसाठीही त्यांना पैसे देत होते. बर्जर पुढे म्हणाले की, जागतिक आर्थिक परिषदेमध्ये प्रत्येक बुकिंगची चार तासांची वेळ, सरासरी ताशी खर्च आणि जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या तीन दिवसांत ‘Titt4Tat’वर केलेल्या अशा ३०० बुकिंगची किंमत २.९ कोटी रुपये होती. “पण, त्याचबरोबर इतर प्रदाते आणि एजन्सीही आहेत. त्या लक्षात घेतल्यास माझ्या अंदाजानुसार ही किंमत एकूण ९.६८ कोटी इतकी असावी,” असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा : महाकुंभमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे नक्की काय? याचे आयोजन नेहमी चर्चेचा विषय का ठरते?

सेक्स पार्टीजमध्ये वाढ

सलोम बाल्थसने न्यूज आउटलेटला सांगितले की, बरेच अतिश्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. प्रत्येकाला माहीत आहे की, हवामान संकटांना थांबवणे कठीण आहे. त्यामुळे या लोकांना केवळ आनंद घ्यायचा असतो, असे सलोम बाल्थस म्हणाले. ते पुढे म्हणाले, हे फक्त दावोसमध्ये आहे, असे नाही; परंतु या परिषदेदरम्यान याचे प्रमाण वाढले. एक विशेष एजन्सी ‘Lia Models’मधील जॅन आणि लिया यांनी ‘डेली मेल’ला सांगितले, “एजन्सीच्या प्रकारात आणि संबंधित किंमतींमध्ये फरक असतो, ज्याचा संबंध सहसा ग्राहकांच्या उत्पन्नाशी असतो.” आमच्या मॉडेल्स बहुधा द्विभाषक असतात. कारण- आम्ही प्रतिष्ठित ग्राहकांना आमची सेवा देतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex parties how davos turned into dark den of global elite gathered for wef rac