पत्रकारितेच्या क्षेत्रात दशकभराचा अनुभव असणार्या महिला पत्रकारांच्या अनुभवावर आधारीत पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय येथे बुधवारी घेण्यात आले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ महिला पत्रकार, संपादिका सुनंदा मोरे यांच्या हस्ते पत्रकारितेतील विविध आघाड्यांवर काम करणार्या वृत्त निवेदिका, महिला पत्रकारांचा कोल्हापूरी फेटा, गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याची घोषणा प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली. महिला पत्रकारांनी सर्वांशी मनमोंकळा संवाद साधत मनोगत व्यक्त केले.
प्रशांत आयरेकर,दिलीप भिसे, बाबासाहेब खाडे, समीर मुजावर, नंदिनी नरेवाडी, अश्विनी टेंबे, भूषण पाटील, सचिन सावंत, भारत चव्हाण यांच्यासह सर्व महिला पत्रकार उपस्थित होत्या.
