कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंतर्गत नवदुर्गामध्ये ओळखल्या जाणाऱ्या कात्यायनी मंदिरात चोरीचा प्रकार काल रात्री घडला आहे. चोरी करत असताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये पकडले गेले आहेत. कोल्हापूर पासून १२ किमीवर निसर्ग संपन्न वातावरण असलेल्या परिसरात कात्यायनी मंदिर आहे. ते काल रात्री बंद करण्यात आले होते. हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ मध्यरात्री एकच्या सुमारास तीन चोरटे मंदिरात गेले. एक जण बाहेर राहून पाळत ठेवत होता. दोघांनी मंदिरात प्रवेशकरून चांदीची प्रभावळ व अन्य दागिने असे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये पकडला गेला असून मंगळवारी पोलिसांनी पाहणी करून या माहितीच्या आधारे तपास सुरु ठेवला आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये याच ऐतिहासिक मंदिरामध्ये चोरट्याने संस्थानकालीन हार, दोन किलो सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले होते.