यंदाच्या हंगामात खरिपाबरोबरच रब्बीचा पेरा चांगला साधेल, पाऊस मोप हुईल. भंडाऱ्याचे निशाण जगावर राज्य करेल, अशी भाकणूक मिरज तालुक्यातील ब्रह्मनाथ यात्रेवेळी सोमवारी पहाटे वर्तविण्यात आली. दीडशे धनगरी ढोलाच्या निनादात सूर्योदयावेळी ही भाकणूक झाली. भाकणूक ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ, माणगावचे हजारो भाविक हजर होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही खंडेराजुरी येथे ब्रह्मनाथाची यात्रा रविवारपासून सुरू झाली. रविवारी गाव नवेद्य झाल्यानंतर गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील तलावाकाठी असलेल्या मंदिराभोवती देवाच्या पालखीची प्रदक्षिणा सुरू झाली. सुमारे १०० मीटर अंतराची ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यास दोन तासांचा अवधी लागला.
अंतिम प्रदक्षिणेला देवाची भाकणूक झाली. यंदा पाऊसकाळ चांगला असून खरीप व रब्बीचा पेरा चांगला साधणार असल्याचे वर्तविण्यात आले. तसेच जनावरांसाठी फारसा रोगराईचा धोका नाही. मात्र राजकीय पटलावर अशांतता पाहण्यास मिळणार आहे. राजकीय उलथापालथीने राजकीय आडाखे चुकणार असल्याचे संकेत या वेळी देण्यात आले. याच बरोबरच भंडाऱ्याचे निशाण जगावर राज्य करण्याची वेळ जवळ आली असल्याचेही भाकीत वर्तविण्यात आले.
या वेळी पालखीसमोर आसपासच्या देिशग, खरिशग, मालगाव, िलगणी, बेडग, एरंडोली आदी गावचे १५० धनगरी ढोल सहभागी झाले होते. ढोलांचा आवाज पहाटेच्या नीरव शांतते सुमारे १५ किलोमीटर परिसरात येत होता.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2016 रोजी प्रकाशित
पाउस मोप हुईल, रब्बीचा पेरा चांगला साधेल; मिरजेच्या ब्रह्मनाथ यात्रेतील भाकणूक
यंदाच्या हंगामात खरिपाबरोबरच रब्बीचा पेरा चांगला साधेल, पाऊस मोप हुईल. भंडाऱ्याचे निशाण जगावर राज्य करेल, अशी भाकणूक मिरज तालुक्यातील ब्रह्मनाथ यात्रेवेळी सोमवारी पहाटे वर्तविण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-04-2016 at 02:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big rain in this year miraj s brahmanatha yatra bhakanuka