लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मकोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्यपदक मिळविल्याबद्दल त्याचे पालकमंत्री हसनमुसरी खासदार शाहू महाराज यांनी अभिनंदन केले आहे. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले खाशाबा जाधव यांच्या नंतर ओलंपिक मधील वैयक्तिक पद स्वप्नील कुसाळे यांच्यामुळे मिळाले असल्याचा आनंद आहे त्याचे मिरवणूक काढण्यात येईल कोल्हापुरात अधिकाधिक क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जातील तर शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेचा लौकिक स्वप्निल कुशाळे याने वाढवला असल्याचा उल्लेख करून त्याला शुभेच्छा दिल्या.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, स्वप्नीलला २०२ मध्ये आम्ही ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊनसन्मानित केले होते. त्याच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल आमदार सतेज पाटील व माझ्यातर्फे ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे.
© The Indian Express (P) Ltd