कोल्हापूर : क्रीडा साहित्याचे बिल मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांची १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी येतील जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्ग एक यांना मंगळवारी प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (रा.  विश्रामबाग सांगली) असे त्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार हे सरकारी विभागास साहित्य पुरवठा करतात. त्यांनी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑनलाइन महा टेंडर वरून निविदा भरून क्रीडा साहित्य पुरवले होते. या साहित्याचे एकूण ८ लाख ८९ हजार रुपये बिल झाले होते. ते मंजूर करण्यासाठी साखरे यांनी बिलाच्या १५ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती  ठरलेली २ लाख १० हजार रुपये ही रक्कम आज सायंकाळी कार्यालयात स्वीकारत असताना साखरे हे पकडले गेले. त्यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District sports officer arrested while accepting bribe of rs 1 lakh and 10 thousand zws