शेतक-यांनी पाण्याचे योग्य नियोजन व खोडवा ऊस पिकांचेही चांगले व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन ठिबक सिंचनाच्या शेतीवर तसेच आडसालीपेक्षा सुरू व पूर्व हंगामी ऊस पिकावर भर देण्याचे आवाहन वारणा समूहाचे नेते व माजी मंत्री विनय कोरे यांनी केले.
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या वतीने शेतक-यांसाठी अवर्षणकाळातील ऊस पीक व्यवस्थापन, ऊस उत्पादनात वाढ, रोग व कीड नियंत्रण आणि ठिबक सिंचनाचे महत्त्व, या विषयावर ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरे म्हणाले, मनपाडळे परिसरात ठिबक सिंचनावर आधारित सहकारी पाणीपुरवठा व सामुदायिक शेतीचे मॉडेल वारणाकडून राबविणार आहे. वारणा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक एन. एच. पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे शास्त्रज्ञ डी. बी. फोंडे, बी. एच. पवार, एम. ए. फुके, विजय माळी यांनी मार्गदर्शन केले. ऊस विकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2016 रोजी प्रकाशित
ठिबक सिंचनाच्या ऊसशेतीवर भर द्यावा
तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या वतीने शेतक-यांसाठी ऊस पीक व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाचे महत्त्व या विषयावर परिसंवाद
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-02-2016 at 03:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Focus should on sugarcane farming of drip irrigation