सदनिका खरेदी व्यवहारात पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक ; खरेदी – विक्री करणारे तिघेही मुंबईचे

जानेवारी २०१९ ते २७  जून २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे शेख यांनी मंगळवारी फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

fraud
( संग्रहित छायाचित्र )

कोल्हापूर : सदनिका खरेदी व्यवहारात पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. गणेश प्रकाश चव्हाण (रा. आर. बी.मार्ग) व जयश्री प्रशांत मुळेकर (रा. माहीम) यांच्या विरोधात इम्तियाज अब्दुल शेख (रा. कुलाबा) यांनी फिर्याद दिली आहे. तिघेही मुंबई येथे राहतात.

माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी करणारे शेख यांना चव्हाण व मुळेकर यांनी कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील गुरुप्रसाद टॉवर्स येथे सदनिका दस्ताद्वारे खरेदी करून दिली होती. तथापि सदनिकेचा ताबा न देता परस्पर भाडेकरू ठेवून त्याचे भाडे आकारले जात होते. नंतर शेख यांना शेजारची सदनिका देण्यात आली. पण ती संशयितांनी शिवराज पाटील या व्यक्तीला विक्री केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांना याच इमारतीतील तीन मिळकती खरेदी करून देतो असे संशयितांनी सांगितले होते. तथापि शेख यांना कागदपत्र, माहिती, पैसे न देता ती ही मालमत्ता सुरेखा राणे या महिलेला खरेदी करून दिली. जानेवारी २०१९ ते २७  जून २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे शेख यांनी मंगळवारी फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud over 2 rs crore in flat purchase transaction in kholapur zws

Next Story
यड्रावकर समर्थक-विरोधक जयसिंगपूरमध्ये आमने-सामने
फोटो गॅलरी