कोल्हापूर : सीमाभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात शनिवारी बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात सणाचा उत्साह शिगेला पोहचला होता. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर, कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती देऊन सजवून त्यांची मिरवणूक ही काढण्यात येते. इचलकरंजी येथे शहरात संस्थान काळापासून कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची शतकोत्तर परंपरा आजही कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : शाश्वत विकास परिषदेतून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, पर्यटन क्षेत्राला गती मिळेल – राजेश क्षीरसागर

बैलांच्या लाकूड ओढण्याच्या शर्यती हे बेंदूर सणाचे खास आकर्षण असते. असा ग्रामीण ढंगाचा खेळ केवळ इचलकरंजीतच होतो. यावर्षी याला मोठा प्रतिसाद मिळाला. सायंकाळी प्रथेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने गावभागात महादेव मंदिरनजीक पारंपारिक पध्दतीने कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी उत्सव कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur bendur festival celebrated in traditional way css