कोल्हापूर : सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करावे, अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज बुधवारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी हि माहिती दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : प्रभात भ्रमंतीवेळी हृदयविकाराने उद्योजक शिरीष सप्रे यांचे निधन

यावेळी जयंत आसगावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील हे आमदार, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, राजर्षी शाहू प्रेमी,मान्यवर उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur hasan mushrif demand pm modi to give bharatratna to chhatrapati shahu maharaj css
Show comments