कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती सोहळा केंद्र आणि राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शासनाने वर्षभर लोकोत्सव म्हणून साजरा करावा अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे. याचे स्मरण करून देण्यासाठी सोमवारी शाहू समाधीस्थळी उपोषण करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. समाज सुधारणेबाबत त्यांनी टाकलेल्या पावलानुसार पुढे केंद्र, राज्य शासनाला अनुकरण करावे लागले. अशा या लोकराजाची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती देश पातळीवर वर्षभर साजरी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शाहू महाराजांचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा : कोल्हापूरचे चुकते कोठे? खासदार शाहू महाराजांना पडला प्रश्न; तीन खासदार असतानाही असे का, याची चिंता

आंदोलनामध्ये आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उबाठाचे उपनेते संजय पवार, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण,दिलीप पवार, बाबुराव कदम, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.