कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत उच्चांक प्रस्थापित केला आहे. तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून गोकुळने विक्रमी कामगिरी नोंदवली.

गतवर्षी याच दिवशी गोकुळने १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर दूध विक्री केली होती. यंदा विक्रीत तब्बल १ लाख ६३ हजार ७६७ लिटरने वाढ झाली आहे.

याबद्दल डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले.