कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील नाईक मळा येथे आलेल्या माकडावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने ते ठार झाले.  कार्यकर्त्यांनी कुत्र्याना हाकलण्याचा केलेला प्रयत्न असफल झाला. मृत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक माकड किरण गॅस  कार्यालया नजिक रस्ता ओलांडत असताना दोन गावठी कुत्र्यानी त्याच्यावर हल्ला केला. अनेक चावे घेतले.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापूरात अनधिकृत होर्डिंगधारकांना दणका; तिघांवर गुन्हा दाखल

दरम्यान , तिथे असणाऱ्या मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, आनंदा मकोटे, भाऊसाहेब सावंत आदी सह इतरांनी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. जखमी माकड मरण पावले. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इचलकरंजीत गेल्या आठवड्यात भटक्या कुत्र्यांनी चावल्यामुळे घोड्याचा मृत्यू ओढावला होता. गेल्या वर्षापूर्वी गोसावी समाजाच्या महिलेचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने ती मरण पावली होती. शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkey dies after bitten by stray dogs in ichalkaranji zws