कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे जाणार आहेत. यामध्ये मनाई आदेश करू नये. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यामार्फत अ‍ॅड. असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बारसू येथे भेट देण्यास मनाई आदेश केला आहे. सोशल मीडियावरदेखील कोणत्याही प्रकारचे पोस्ट करण्यासदेखील मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या नोटीसला राजू शेट्टी यांनी उत्तर पाठवले आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची पत्नीने तक्रार केल्यानंतर कबर खुदाई करून मृतदेह बाहेर काढला

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, राजू शेट्टी यांनी चळवळीमध्ये तसेच सक्रिय राजकारणात कधीच असंसदीय शब्दांचा वापर केला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच लढा देत आले आहेत. त्यांना सोशल मीडियावरदेखील प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे. शेट्टी यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर असून सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा; अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही असिम सरोदे यांनी दिला आहे. तसेच राजू शेट्टी हे बारसू येथील अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे त्यांनी कळवले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Otherwise an appeal has to be sought in the high court raju shetty warning to ratnagiri district collector ssb