कोल्हापूर : स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करणे सोडून द्यावे अन्यथा आंदोलनाची सुरुवात आपल्या गाडीपासूनच होऊ नये तुमची बौद्धिक चालबाजी चालणार नाही, असा इशारा ठाकरे सेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकल मराठा समाजाचे समाजाच्या प्रश्नावर गणेशोत्सवपूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन देऊन कोल्हापुरातील आंदोलन स्थगित केले होते. अजून बैठक न झाल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावरून उबाठा सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांना उद्देशून मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल असा इशारा दिला आहे.  ‘मुश्रीफ साहेब, तुम्ही एका विशिष्ट समाजातले असून तुमच्या असून सुद्धा तुमचे सर्व समाज कल्याणकारी धोरण पाहून जनतेने भरभरून प्रेम केले. कदाचित वेळ मरून याची सवय लागली असावी. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या शिष्टाईचा विसर पडला आहे.  आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करणे सोडून द्यावे अन्यथा आंदोलनाचे सुरुवात आपल्या गाडीपासून होऊ नये. तुमची बौद्धिक चालबाजी चालणार नाही, ‘असा इशारा यावेळी देण्यात आला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop using the maratha community for selfish purposes thackeray group warning to hasan mushrif ysh