scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
आमदार अपात्र ठरल्यास ठाकरेंचे बहुमत! कपिल सिबल यांचा युक्तिवाद; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ठाकरे गटाकडे एकूण ३४ आमदार व खासदार, तर शिंदे गटाकडे ५३ आमदार व खासदार होते.

shiv-sena-case-kapil-sibal-supreme-court-argument-party-symbol
Shivsena Case:अपात्र होणाऱ्या व्यक्तिला मुख्यमंत्रिपद; सिब्बल यांनी नेमके कोणते मुद्दे मांडले? | PS3

शिवसेना कुणाची या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक…

Sanjay Raut On Shiv Sena Symbol Case Supreme Court
“निवडणूक आयोगाने निर्णय आधी ठरवला, मग ते गुवाहाटीला गेले”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात काय घडलं? म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं भाष्य केलं आहे.

What Kapil Sibbal Said in SC?
“अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं”, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी काय मुद्दे मांडले?

निवडणूक आयोगाकडे कोणतेही अधिकारक्षेत्र नव्हतं, मात्र केवळ एकनाथ शिंदे यांना लाभ मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकाराबाहेरचा निर्णय घेतला असंही…

sanjay raut made a alligation on amit shah ani election commision
‘५ हजार कोटींना शिवसेना विकली?’ Sanjay Raut यांचे आरोप; Amit Shah आणि निवडणूक आयोगावर निशाणा

‘५ हजार कोटींना शिवसेना विकली’ – संजय राऊतांचा गंभीर आरोप अमित शाहांच्या दबावाखाली निर्णय झाल्याचा राऊतांचा दावा संजय राऊतांचा निवडणूक…

Maharashtra News Live Updates| Marathi News Live Updates
Maharashtra Breaking News Updates: शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आजची सुनावणी संपली; सिब्बल यांनी काय युक्तिवाद केला? वाचा

Maharashtra News Updates: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

Shiv Sena Symbol Case Supreme Court
“निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवलं जातंय”; शिंदे सेनेची ठाकरे सेनेच्या युक्तिवादावर मोठी प्रतिक्रिया

कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

shiv sena Supreme Court case verdict Eknath shinde favor mla bacchu kadu claims manoj jarange patil warn devendra fadnavis
निकाल शिंदेंच्याच बाजूने लागणार, बड्या नेत्याचा दावा; शिंदे-फडणवीसांना जरांगेंचा इशारा, वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Top Political News in Marathi : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूनेच लागणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी…

Shiv Sena Symbol Case Supreme Court
शिवसेना पक्ष अन् चिन्हाचा पेच सुटणार? सर्वोच्च न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद? संजय राऊतांनी सांगितली मोठी माहिती

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या या प्रकरणावर आज न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद झाला? याची माहिती संजय राऊतांनी सांगितली.

Kapil Sibal arguments in Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Bow and Arrow Symbol dispute updates | सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी | उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना वाद कपिल सिब्बल युक्तिवाद
SC on Shiv Sena Symbol Hearing : “एकनाथ शिंदेंची निवडच बेकायदेशीर”, खरी शिवसेना कोणाची? ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Shiv Sena Party Name and Symbol Hearing Updates: या सुनावणीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंची मुख्य नेता पदी निवड कशी झाली?”, कपिल सिब्बल यांचा सवाल, सर्वोच्च न्यायालयातला युक्तिवाद काय?

आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आशेचा किरण दिसतो आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी सुनावणीनंतर दिली आहे.

shiv-sena-symbol-case-supreme-court-hearing-kapil-sibal-sanjay-raut
“शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी,” ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद; “आता आम्हाला न्याय मिळेल,” संजय राऊतांना विश्वास; वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Top Political News Today : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल…

संबंधित बातम्या