कोल्हापूर महानगरपालिका, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, महावितरण व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने ‘अर्थ अवर’ हा उपक्रम १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. महापालिकेच्या वतीने रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत कोल्हापूर शहरातील सर्व स्ट्रीट लाइट्स बंद ठेवण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनीही या वेळेत लाइट बंद ठेवून या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तसेच उपमहापौर या वरील वेळेत स्वत:च्या घरातील दिवे बंद ठेवून सहभागी होणार आहे असे जाहीर केले.
साधारणपणे ६० वॉटचा एक घरगुती बल्बचा वापर केल्यामुळे ६० ग्रॅम कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जति होते. याचा विचार करता कोल्हापूर शहरातील सुमारे २० हजार स्ट्रीट लाइट एका तासाकरिता बंद ठेवल्यामुळे साधारणत: २० हजार युनिट इतकी ऊर्जा वाचू शकेल, अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पृथ्वीचे तापमान काही अंशी कमी होण्यास मदत होईल.
या वेळी ‘अर्थ अवर’ या उपक्रमाची माहिती सृष्टी नेचर क्लबचे प्रा. प्रमोद चौगुले यांनी दिली. कोल्हापूर शहरामध्ये गेली चार वर्षे साजऱ्या होत असलेल्या या उपक्रमाची व्याप्ती दरवर्षी थोडय़ा प्रमाणात वाढत आहे. या वर्षी ‘अर्थ अवर’ दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचचा आनंद सर्वानी एकत्र बसून घ्यावा, असे आवाहन प्रा. राजू रायकर यांनी केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे िबदू चौक येथे रात्री एन.एस.एस.चे २००0 स्वयंसेवक सुमारे २००० पणत्यांपासून ‘६० अ’ हा लोगो तयार करण्यासाठी सहभागी होतील, अशी माहिती प्रा. राहुल पाटील यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात उद्या ‘अर्थ अवर’ उपक्रम
कोल्हापूर मनपा, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, महावितरण व विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-03-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorrow earth hour programme in kolhapur