तीन दिवस ‘पाणीबाणी’ने
करवीरकरांची तारांबळ
(२६ टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा)
प्रतिनिधी, कोल्हापूर
सलग तीन दिवस पाणी येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केल्याने गुरुवारी करवीरकरांवर पाण्यासाठी ऐन उन्हात पायपीट करावी लागली. महापालिकेने २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे ठरवले असले तरी ही यंत्रणा खूपच उपुरी पडू लागली आहे. तर टँकरचे पाणी मिळविण्यासाठी नागरिक मुद्यावरून गुद्यावर येऊ लागले आहे. शहरात पाणीबाणीचा त्रास सुरू झाला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन गळती काढण्याचा कामाला प्राधान्य देत आहे. अयोध्या कॉलनी, चिव्यांचा बाजार, पुईखडी, फुलेवाडी अशा चार ठिकाणी गळती काढण्याचे काम सुरु असल्याने शहराच्या निम्म्या भागात शनिवापर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.
कोल्हापूर महापालिकेच्या बेजबाबदार धोरणामुळे नागरिकांना पाण्यासाठी भांडी कुंडी घेऊन धावपळ करावी लागत आहे . या पाणीटंचाईच्या काळात पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी भाडय़ाने टॅँकर घेण्यात येत आले असले तरी पाण्याच्या मागणीच्या तुलनेत टॅँकर अपुरे पडत आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा होणार नाही, त्या भागात भाडय़ाने घेतलेल्या २० तसेच महानगरपालिकेच्या सहा टॅँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.
निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने तीन दिवसांसाठी महापालिका प्रशासनाने १० हजार लिटर पाण्याचे २० खासगी टँकर भाड्याने घेतले असून याद्वारे तहान भागवण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे.
‘गळकी योजना’ िशगणापूर पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीला लागलेल्या असंख्य गळतींपकी आता शेवटच्या चार गळती काढण्याचे काम गुरुवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून हाती घेण्यात आहे. सलग दोन दिवस अहोरात्र हे काम सुरू ठेवून लवकरात लवकर पाणीपुरवठा कसा सुरू होईल, या दृष्टीने मनपा पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. दरम्यान, िशगणापूर पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. या योजनेच्या पुईखडीपासून ताराराणी चौकापर्यंत नेण्यासाठी टाकलेल्या जलवाहिन्या अत्यंत निकृष्ट असल्याने त्याला वारंवार गळती लागायला सुरुवात झाली. चार वर्षांपूर्वी सोळा कोटींचा निधी खर्च होऊनही ८० टक्के जलवाहिनी बदलण्यात आली. त्यालाही वारंवार गळती लागत असल्याने पाणी पुरवठ्याचे नियोजन कोसळले आहे. गुरुवारपासून गळती काढण्याचे काम हाती घेतले जात आहे. त्याबरोबरच फुलेवाडी जकात नाका व राधानगरी रोडवरील ए वन मोटार गॅरेजसमोरील गळती काढण्याचेही काम हाती घेण्यात येणार आहे. एकाच वेळी चार ठिकाणची गळती काढण्याचे काम जी.के.सी. इन्फ्रास्ट्रर ही कंपनी काम करत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2016 रोजी प्रकाशित
तीन दिवस ‘पाणीबाणी’ने करवीरकरांची तारांबळ
२६ टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-04-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water prblem for 3 day in kolhapur