टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम शर्यतीतून भारत आधीच बाहेर पडला आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता अंतिम फेरीत आज इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. भारत टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला असला, तरी पण फायनलनंतर भारतीय आवाज हे मुख्य आकर्षण ठरणार हे नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही बोलत आहोत भारतीय वंशाच्या १३ वर्षीय जानकी ईश्वरबद्दल. टी-२० विश्वचषकाच्या फायनलनंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर समारोप समारंभात जानकी परफॉर्म करणार आहे. जानकीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आणि तिथेच वाढली. ‘द व्हॉइस ऑस्ट्रेलिया’ मधील आपल्या सुरेल आवाजाने तिने जगभरातील लाखो लोकांना आपले चाहते बनवले आहे. आता जानकी समारोप समारंभात ऑस्ट्रेलियन रॉक ग्रुप आईसहाउससोबत परफॉर्म करताना दिसणार आहे.

जानकी आईसहाऊसच्या ‘वुई कॅन गेट टुगेदर’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. यात झिम्बाब्वेत जन्मलेला थांडे सिकविलाही तिला साथ देताना दिसणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना जानकी या संधीबद्दल खूप उत्साहित होती. ती म्हणाली, ”मेलबर्नमध्ये प्रचंड जनसमुदायासमोर सादरीकरण करणे हा एक अविश्वसनीय अनुभव असेल आणि जगभरातील लाखो लोक हे प्रदर्शन पाहतील. माझे आई-वडील क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांच्याद्वारेच मला ही संधी कळली. मी ऐकले की तिकिटे आधीच विकली गेली आहेत. मी परफॉर्मन्स आणि सामन्यासाठी उत्सुक आहे. भारताने अंतिम सामना खेळला असता तर बरे झाले असते.”

एका पॉप कल्चर मासिकानुसार, राग कामसमध्ये गाण्यापासून ते द व्हॉईस ऑस्ट्रेलियावर बिली इलिशच्या “लव्हली” कव्हर करण्यापर्यंत, गायिका-गीतकार जानकी ईश्वरने तिच्या आवाजासाठी खूप प्रशंसा मिळवली आहे. कीथ अर्बन, रीटा ओरा आणि जेसिका मौबॉय यांसारख्या प्रशिक्षकांना आकर्षित केल्यानंतर ती २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खळबळ माजली. जानकीने तिचा अलीकडचा काळ केरळमध्ये टेलिव्हिजन परफॉर्मन्समध्ये घालवला आहे.

हेही वाचा – BCCI Secretary: आयसीसीमध्ये जय शाह यांच्याकडे मोठी जबाबदारी; ‘या’ समितीच्या प्रमुखपदी झाली नियुक्ती

जानकीचे आई-वडील दिव्या रवींद्रन आणि अनूप दिवाकरन हे केरळमधील कोझिकोड येथील आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात राहत आहेत. जानकीच्या पालकांनी तिला प्रथम भारतीय संगीताची ओळख करून दिली आणि जानकी पाच वर्षांची असताना तिने कर्नाटक गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. हळूहळू जानकीने पॉप गायनातही प्रभुत्व मिळवले. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी आयोजित समारंभात गौरव करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 year old indian origin girl janaki easwer to perform at t20 world cup 2022 final england vs pakistan vbm