महिलांच्या चौथ्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेला गुरुवारपासून भोपाळमध्ये प्रारंभ होत आहे. त्यामध्ये ३२ संघांनी भाग घेतला आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियम व ऐशबाग स्टेडियम या ठिकाणी हे सामने होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह ६५० खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा अकरा दिवस चालणार आहे.
भाग घेतलेल्या संघांची विभागणी पुढीलप्रमाणे- ‘अ’ गट- हरयाणा, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ, रेल्वे, उत्तर प्रदेश, चंडीगढ, बिहार, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबई, भोपाळ, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ.
‘ब’ गट- आसाम, बंगाल, गोवा, विदर्भ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर, गंगापूर ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, राजस्थान, दिल्ली, गुजरात, पुडुचेरी.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2014 रोजी प्रकाशित
महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ३२ संघ सहभागी
महिलांच्या चौथ्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेला गुरुवारपासून भोपाळमध्ये प्रारंभ होत आहे. त्यामध्ये ३२ संघांनी भाग घेतला आहे.
First published on: 13-03-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 32 teams to participate in national women hockey