सध्या जगभरात करोना विषाणूचा फैलाव झपाट्याने सुरू आहे. प्रत्येक देश करोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व क्रिकेटपटू घरीच आहेत. काही क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर टिकटॉक व्हिडीओ बनवण्यात आघाडीवर आहे. त्यातच त्याचा सहकारी अरॉन फिंच यानेही एक टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे.

…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात” – सचिन तेंडुलकर

वॉर्नरनंतर फिंचने टिकटॉक वर व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. एका म्युझिकवर तो डान्स करत होता. पण डान्स सुरू असतानाच मागून आवाज आला, “नको… कृपया डान्स थांबवा..” फिंचने डान्स थांबवला आणि पुन्हा नाचायला सुरुवात केली. त्यावेळी पुन्हा तसाच आवाज आला. ते ऐकून अखेर फिंच फ्रेम मधून निघून गेला. हा व्हिडीओ फिंचने टिकटॉक वर शेअर केला आहे. मी ३० वर्षावरील आहे आणि टिकटॉक वर डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. (पण मला ते जमत नाहीये) त्यामुळे बहुतेक मी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करेन, असे त्याने मजेशीर कॅप्शन दिले आहे.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

फिंचचा डान्सचा प्रयोग फसला असला तरी वॉर्नर मात्र चाहत्यांकडून टिकटॉकवर वाहवा मिळवतो आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करतानाचा त्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत त्याने लेकीसोबत ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स केला. त्यानंतर वॉर्नरने त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर ‘साऊथ स्टार’ अल्लू अर्जूनच्या गाण्यावर ही श्री व सौ वॉर्नर थिरकताना दिसले.

VIDEO : “माझ्यापेक्षा चांगलं करून दाखव”; वॉर्नरचं फिंचला ‘हटके’ चॅलेंज

याशिवाय, वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात वॉर्नरच्या हातात चहाचा कप आहे. चहा गरम असल्याने तो दोन हातांचा समतोल साधून चहाचा कप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. तसेच त्यानंतर तो चहाचा घोट पिऊन विचित्र हावभाव करतानाही दिसतो आहे. हे सारं वॉर्नर एका म्यूझीकच्या लयीवर करताना दिसतो आहे. असंच किंवा यापेक्षाही चांगल्या प्रकारे तू असं करू शकतोस का ते दाखव, असं आव्हान त्याने सहकारी खेळाडू अरॉन फिंचला दिले आहे.