AFG vs AUS highlights in Marathi: अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावात पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. पण प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघ्या १० षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला आहे. पण पंचांच्या एका चुकीमुळे अफगाणिस्तान इतकी मोठी धावसंख्या करू शकला नसता. लवकरच सर्वबाद झाला असता, नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अफगाणिस्तानच्या डावात नूर अहमद क्रीझच्या बाहेर होता, यष्टीरक्षक इंग्लिशने बेल्स उडवले होते पण असे असूनही तो नाबाद राहिला आणि याचे कारण पंचाची चूक होती.

अफगाणिस्तानच्या डावातील ४७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नूर अहमद एक धाव घेत लगेचच क्रीजच्या बाहेर गेला आणि यादरम्यान यष्टीरक्षक इंग्लिसने चेंडू घेत बेल्स उडवल्या. पाहिलं तर तो आऊट होता पण अंपायरच्या चुकीमुळे नूर अहमदला आऊट दिलं गेला नाही. यामागचं कारण म्हणजे चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अंपायरने ओव्हर संपल्याचा इशारा केला होता. यानंतर नूर अहमद क्रीझच्या बाहेर गेला आणि इंग्लिशने बेल्स उडवले आणि त्यामुळे फलंदाजाला आऊट देण्यात आले नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही अपील केले नाही.

क्रिकेटमध्ये साधा नियम आहे की जोपर्यंत चेंडू यष्टीरक्षक आणि गोलंदाजापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अंपायर त्याला डेड देऊ शकत नाही. पण लाहोरच्या मैदानावर पंचांनी हा नियम मोडला. मागे अशी घटना घडली होती तेव्हा कारवाई झाली होती.

यापूर्वी अशी घटना ही घटना, २०२३ च्या अॅशेल मालिकेत घडली होती. जिथे ऑस्ट्रेलियाचा कसोटी यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीच्या चपळाईमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो एका विचित्र स्टंपिंगमध्ये बाद झाला. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत ३७१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवशी ४ बाद ११४ धावा केल्या होत्या.

अखेरच्या दिवशी फलंदाजी करताना बेअरस्टो अॅलेक्स कॅरीच्या चपळाईमुळे सहाव्यांदा बाद झाला आणि ही विकेट ऑस्ट्रेलियासाठी ४३ धावांनी विजय मिळवण्यासाठी निर्णायक ठरली. कॅमेरून ग्रीनच्या शॉर्ट बॉलवर बेअरस्टोला स्टंपिंगने बाद केले. या विकेटमुळे इंग्लिश चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. मेरिलेबोन क्रिकेट क्लब (MCC) सदस्यावर आजीवन बंदी घातली गेली आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झालेल्या संघर्षानंतर दोन MCC सदस्यांना निलंबित करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afg vs aus australia captain steve smith urges umpire to withdraw run out appeal after josh inglis noor ahmad incident bdg